महाराष्ट्राच्या विदर्भातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामानाचा मोठा फटका पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेचा लाभ मिळत नसल्याबाबत शेतकरी नाराज अनेकवेळा कोणतीही स्पष्ट कारणे न देता दावे नाकारले जातातपैसेही वेळेवर मिळत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणेअसे वाटते की जणू दावाच गायब झाला.Crop Insurance Delays: महाराष्ट्राच्या विदर्भातील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामानाचा मोठा फटका बसत आहे. त्यात त्यांना विमा दाव्यांची रक्कम मिळण्यास विलंब होत असल्याने वारंवार होणाऱ्या नुकसानीपासून दिलासा मिळालेला नाही. नागपूर जिल्ह्यातील लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेचा (RWBCIS) लाभ मिळत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा कोणतीही स्पष्ट कारणे न देता दावे नाकारले जातात अथवा त्याला विलंब केला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे..पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना २०१६ मध्ये सुरू झाली होती. या योजनेला २०२५-२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यासाठी सुमारे ७१,८१० कोटी रुपयांची (८.३५ अब्ज डॉलर) तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की विम्याचे रक्कम मिळण्याची प्रक्रिया पारदर्शक नाही. तसेच पैसेही वेळेवर मिळत नाहीत..Citrus Estate : इसारवाडीत आकार घेतोय ‘सिट्रस इस्टेट’ प्रकल्प.नरसिंगी गावातील एका शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, २०२३ मध्ये मोसंबी पिकाचा विमा उतरवण्यासाठी जवळपास ५,१६० रुपये भरले. पण या भागाला गारपिटीचा तडाखा बसला आणि उत्पादनात मोठी घट झाल्यानंतर त्यांचा दावा फेटाळण्यात आला. “पीक विमा दावा का नाकारण्यात आला?, याबाबत आम्हाला कोणताही मेसेज मिळाला नाही. तसेच कारण देण्यात आले नाही. जणू की दावाच गायब झाला,” असे शेतकऱ्याने सांगितले..Crop Insurance Compensation : सिंधुदुर्गमधील आंबा, काजू बागायतदारांना दिवाळीपूर्वी फळपीक विमा परतावा .गेल्या काही वर्षांत विदर्भातील अनेक शेतकरी संत्री पिकाकडून मोसंबीकडे वळले आहेत. मुख्यतः अनियमित पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांचा मोसंबी पिकाकडे कल वाढला आहे. कारण मोसंबीला संत्र्यांपेक्षा ४० ते ५० टक्के कमी पाणी लागते. ते अर्ध शुष्क वातावरणासाठी अधिक अनुकूल असते. महाराष्ट्र हे आंध्र प्रदेशनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मोसंबी उत्पादक राज्य आहे. महाराष्ट्रात २०२३-२४ मध्ये ७७,७०० हेक्टरवर सुमारे ९ लाख ४४ हजार टन उत्पादन घेण्यात आले होते..असे असतानाही, हवामानविषयक आव्हाने कायम आहेत. वारंवार येणारी उष्णतेची लाट, दुष्काळ आणि अनियमित पावसामुळे लिंबूवर्गीय पिकांना धोका निर्माण झाला आहे. २०१९ मधील दुष्काळात, विदर्भातील सुमारे ६० टक्के संत्र्यांच्या बागा नष्ट झाल्या. यामुळे सुमारे १,६६८ कोटींचे नुकसान झाले. या प्रदेशात ४८ अंश सेल्सियसपर्यंत तापमान वाढते. येथे केवळ ७०५ मिलीमीटर पाऊस पडतो. हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूपच कमी आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.