Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती
Fertiliser Linking : १५ जूनपर्यंत राज्यातील ८३३ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित, तर ५५ खत केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचेही कृषिमंत्र्यांनी लेखी उत्तरात सांगितले. खतांच्या लिंकिंगबाबत आमदारांनी गुरुवारी (ता.२५) तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.