Chhatrapati Sambhajinagar News: मुद्रांक, नोंदणी कार्यालयाच्या छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत छत्रपती संभाजीनगरसह बीड आणि जालना हे तीन जिल्हे येतात. राज्य शासनाकडून २०२५-२६ या वर्षासाठी विभागाला एक हजार ३१५ कोटी रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. या उद्दिष्टाच्या तुलनेत विभागाने दहा महिन्यांत ७४.९९ टक्के म्हणजेच ९८६ कोटी १६ लाख रुपयांचा महसुल शासनाच्या तिजोरीत जमा केल्याची माहिती मुद्रांक, नोंदणी कार्यालयातर्फे देण्यात आली. मार्च अखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान आता यंत्रणेसमोर आहे..एक एप्रिलपासून रेडीरेकनरच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता गृहित धरून मार्चअखेर दस्त नोंदणी व्हावी, यासाठी नागरिक नोंदणी कार्यालयांत गर्दी करतात. हा अनुभव लक्षात घेता मार्च महिन्यात कार्यालयीन वेळेत एक ते दोन तासांची वाढ करावी, असा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती मुद्रांक, नोंदणी कार्यालयातील सूत्रांनी दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला ८७५ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे..Stamp Duty : शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफीचा राज्य सरकारचा निर्णय.जिल्हाभरात एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ अखेर ८५ हजार ४७५ विविध दस्तांची नोंदणी झाली. त्यातून एकूण ६६२ कोटी ५८ लाखांचा महसूल मिळाला आहे. जानेवारी महिन्यात ८ हजार ८१९ दस्तांची नोंदणी झाली. यात ग्रासद्वारे ६९ कोटी ६७ लाखांचा महसूल प्राप्त झाला. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत ७५.७२ टक्के महसूल जिल्ह्याने प्राप्त केला आहे..Stamp Duty: पार्थ पवार स्टॅम्प ड्युटी प्रकरणानंतर सरकार अॅक्शन मोडवर; सवलतींची आता दर महिन्याला तपासणी करणार .१०० टक्के उद्दिष्टाचे आव्हानविभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९८६ कोटी १६ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. उर्वरित साधारण २५ टक्के वसूली एकाच महिन्यात अर्थात मार्चअखेर करण्याचे आव्हान नोंदणी उपमहानिरीक्षक कार्यालयासमोर आहे..जालना, बीड जिल्हा पिछाडीवरजालना जिल्ह्यातील नोंदणी कार्यालयास २०५ कोटी वसुलीचे उद्दिष्ट असतानाच जानेवारी १५२ कोटी ३४ लाख रुपयांचा (७४.३२ टक्के) महसूल प्राप्त करण्यास यश मिळाले. या दहा महिन्यात एकूण ३९ हजार ३५० दस्तांची नोंदणी झाली. बीड जिल्ह्यास २३५ कोटी रुपये महसूल प्राप्तीचे उद्दिष्ट असतानाच आतापर्यंत १७१ कोटी २४ लाखाचा (७२.८७ टक्के) महसूल शासन तिजोरीत जमा झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.