Seed Germination Issue: राज्यभरात सोयाबीन बियाण्यांच्या उगवण न झाल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर बियाणे विक्रेते आक्रमक झाले आहेत. बियाण्यांच्या गुणवत्तेची शहानिशा न करता तक्रारी दाखल केल्या जात असल्याने विक्रेत्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा दावा करत त्याविरोधात बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा ‘महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाइड्स अँड सीड्स डीलर्स असोसिएशन’ने (माफदा) दिला आहे..‘माफदा’चे अध्यक्ष विनोद तराळ पाटील आणि सरचिटणीस विपिन कासलीवाल यांनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांना पत्र पाठवून विक्रेत्यांची भूमिका मांडली आहे..Soybean Seeds Fraud: पश्चिम विदर्भात सोयाबीन बियाण्यांचा ‘फसवा खेळ’!.या पत्रानुसार, बियाणे कंपन्यांकडून वेष्टणबंद स्वरूपात येणारा माल विक्रेते शेतकऱ्यांना विकतात. त्यामुळे बियाण्यांच्या गुणवत्तेतील त्रुटींसाठी विक्रेत्यांना जबाबदार धरणे योग्य नसल्याचा दावा करण्यात आला आहे..Soybean Seed Controversy : निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणात कंपन्यांवर कारवाई; बियाणे विक्री परवाने निलंबित, कृषिमंत्र्यांची ग्वाही.पत्रात नमूद केल्याप्रमाणे, एका लॉटमध्ये सुमारे ५०० बियाण्यांच्या पिशव्या असतात. काही लॉटमध्ये अडीच टक्क्यांपर्यंत उगवण क्षमतेबाबत तक्रारी येऊ शकतात. मात्र उगवण ही पाऊस, पेरणीची वेळ, जमिनीचा प्रकार आणि अन्य परिस्थितींवरही अवलंबून असते. असे असताना उगवण झालेल्या शेतकऱ्यांकडूनही तक्रारी दाखल होत असल्याचा दावा माफदाने केला आहे..माफदाने तक्रार प्रक्रियेत बदल करण्याची मागणीही केली आहे. त्यानुसार, तक्रार दाखल करताना भौगोलिक स्थान (जिओ-टॅग) असलेली छायाचित्रे जोडणे सक्तीचे करावे, आवश्यक कागदपत्रांची मागणी विक्रेत्यांऐवजी संबंधित बियाणे कंपनीकडून व्हावी, तक्रारींसाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करावे, प्रत्यक्ष पडताळणीनंतरच तक्रार ग्राह्य धरावी आणि खोटी तक्रार करणाऱ्यांना दोन वर्षांसाठी तक्रार करण्यास बंदी घालावी..सोयाबीन बियाणांसंदर्भातील कारवायांत झालेली वाढ आणि शेतकऱ्यांचा वाढलेला रोष, या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांनी ‘माफदा’ला भूमिका घेण्याचा आग्रह धरला होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.