Pune News: ‘ॲक्शन फॉर अॅग्रिकल्चरल रिन्यूअल इन महाराष्ट्र’ अर्थात ‘अफार्म’ने येत्या २८ व २९ जानेवारीला पुण्यात पहिल्या राज्यव्यापी उपजीविका परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत शेतकरी, महिला, युवक आणि आदिवासी कुटुंबांच्या शाश्वत विकासाची वाटचाल निश्चित करण्यासाठी मंथन होणार आहे..‘यशदा’ येथे होणाऱ्या या ‘महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका परिषद २०२६’ मध्ये ३०० संस्थांचा सहभाग असेल. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते तिचे उद्घाटन होईल..Maharashtra Rural Conclave: शाश्वत भविष्यासाठी सामूहिक विचारमंथन.या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, नाबार्डच्या मुख्य सरव्यवस्थापिका श्रीमती रश्मी दराड, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश सागर, आदिवासी विभागाच्या आयुक्त श्रीमती लीना बनसोड, माजी कृषी आयुक्त डॉ. उमाकांत दांगट,.‘माविम’चे महाव्यवस्थापक महेंद्र गमरे, ‘एमकेसीएल’ व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे, ‘एमकेसीएल फाउंडेशन’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वीणा कामत, ‘यशदा’चे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, ‘पोकरा’चे विशेषज्ञ विजय कोळेकर, ‘बाएफ’चे माजी अध्यक्ष डॉ. नारायण हेगडे व गिरीश सोहनी; तर समारोप सत्राला नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. मिहीर शहा मार्गदर्शन करणार आहेत..Agrowon FPC Conclave: सखोल अभ्यास, दीर्घकाळ चिकाटीच देईल यश .राज्याच्या ग्रामीण उपजीविकांची सद्यःस्थिती जाणून घेत पुढील वाटचालीसाठी शिफारशी तयार करण्याचे उद्दिष्ट या परिषदेने ठेवले आहे. याशिवाय हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत आणि सुरक्षित उपजीविकेचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न परिषदेत होणार आहे..शेती व शेतीपूरक उपजीविकांसोबतच बिगरशेती उपजीविकांवर कसा भर देता येईल, सरकारी धोरणे व उपक्रमाची उद्दिष्टे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतील दरी कशी भरून काढता येईल, याबाबत तज्ज्ञांकडून यावेळी ऊहापोह होईल. राज्यातील महिला, युवक, भूमिहीन व आदिवासींच्या विकासविषयक संधी वाढवण्याचे ध्येय या परिषदेने ठेवले आहे..शेतकरी, महिला, युवक आणि आदिवासी वर्गाच्या प्रगतीसाठी त्यांच्या शाश्वत उपजीविकेवर प्रभावीपणे काम करावे लागेल. या कामाची दिशा निश्चित करणारी ही दोनदिवसीय परिषद राज्याच्या ग्रामीण भविष्यासाठी मैलाचा दगड ठरेल.डॉ. व्यंकट मायंदे, माजी कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व विद्यमान अध्यक्ष ‘अफार्म’.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.