Ativurshti List GR : अतिवृष्टीबाधित तालुक्यांची सुधारित यादी प्रसिद्ध; २९ तालुक्यांचा नव्याने समावेश
GR Ativrushti Maharashtra : राज्य सरकारने शुक्रवारी (ता.१०) सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध करून २९ तालुक्यांचा नव्याने समावेश केला आहे. यामध्ये अंशत:बाधित आणि पूर्णत:बाधित असे वर्गीकरण राज्य सरकारने केले आहे. तसेच अंशत बाधित तालुक्यातील प्रत्यक्ष बाधित मंडळांना सवलती मिळणार असल्याचे राज्य सरकारने शासन निर्णयात स्पष्ट केले आहे.