Maharashtra Politics Update: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांच्या मतमोजणीत बुधवारी (ता. २८) सायंकाळी पाच वाजेपर्यंत पदवीधर मतदारसंघांत चुरस कायम होती. पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव, नागपूरमध्ये सुधाकर कोहळे, तर मराठवाड्यात डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर होते. दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवला, तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात महायुतीचे (शिवसेना शिंदे गट) किरण रामराव सरनाईक विजयी झाले..पुणे पदवीधर मतदारसंघात हर्षदा देशमुख-जाधव यांना १ लाख १२ हजार, तर स्मिता जाधव यांना १ लाख २ हजार मते मिळाली होती. हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे ६० हजार ९२४ मतांसह आघाडीवर होते..Sangli District Bank Election: सांगली जिल्हा बँक निवडणुकीत सहा जागांवर अटीतटीची लढत.काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना ५६ हजार ६३० मते मिळाली होती. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील ५४ हजार ९५ मते मिळवत आघाडीवर होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सतीश चव्हाण यांना ४३ हजार १६१ मते मिळाली होती..औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात विजयासाठी आवश्यक ८८ हजार ५५८ मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण न केल्याने पसंतीक्रमानुसार मतमोजणी सुरू होती..Maharashtra MLC Election Results: पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे विजयी, 'महायुती', 'महाविकास आघाडी'ला किती जागा?.शिक्षक मतदारसंघांचा निकालपुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी १७ हजार ६०० मते मिळवत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन सानप यांना ११ हजार ३२८ मते मिळाली. सानप यांना शिंदे गटाचा पाठिंबा होता..अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात महायुतीचे (शिवसेना शिंदे गट) उमेदवार किरण रामराव सरनाईक यांनी विजय मिळवला. अंतिम मतमोजणीनंतर त्यांना १६ हजार ६६३ मते मिळाली. काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रा. अदिती पोहरे यांना ८ हजार ६३६ मते मिळाली. या निवडणुकीत सरनाईक यांच्यासह प्रा. अदिती पोहरे आणि शिंदे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार, माजी आमदार डॉ. श्रीकांत देशपांडे यांच्यात प्रमुख लढत झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.