Mukhyamantri Gramin Pashudhan Udyogakta Yojana: राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५ दुधाळ गायी किंवा म्हशी (प्रत्येकी १ लाख, एकूण ५ लाख रुपये , ३ वर्षांचा विमा ६० हजार १८० रुपये, शेडसाठी ३ लाख आणि उपकरणांसाठी (कडबाकुट्टी यंत्र, फॉगिंग मशीन, मिल्कींग मशीन, सोलर इ.) २ लाख ७५ लाख असे मिळून सुमारे ११ लाख ३५ लाखांचे प्रकल्प साहित्य दिले जाणार आहे..या योजनेत ग्रामीण भागातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, वनहक्क धारक आणि महिला बचत गटांना प्राधान्याने लाभ दिला जातो. पहिल्या टप्प्यात ५० टक्के अनुदानाची रक्कम दिली जाते, तर जनावरांची खरेदी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अनुदान डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात जमा केले जाते.या योजनेत, सर्वसाधारण प्रवर्गाला ५० टक्के आणि अनुसूचित जाती-जमातींना ७५ टक्के अनुदान मिळते. तसेच दिव्यांगांसाठी ५ टक्के आणि महिलांसाठी ३० टक्के आरक्षण असून, या योजनेमुळे लाभार्थींना दुग्ध व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळवून उद्योजक होण्याची संधी मिळणार आहे..Free Electricity Scheme: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या सवलतीपोटी २,२९४ कोटींचा निधी .योजनेचा उद्देशया योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागात पशुपालन व दुग्ध व्यवसायाला चालना देऊन अल्पभूधारक शेतकरी, महिला बचत गट आणि वनहक्क धारकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे. तसेच संकरित जनावरांच्या माध्यमातून स्थिर उत्पन्न मिळवून देणे हा आहे..योजनेचे फायदेया योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ५ दुधाळ गायी किंवा म्हशी, विमा, शेड आणि उपकरणांसाठी एकूण ११.३५ लाख रुपयांचे प्रकल्प साहित्य मिळते.सर्वसाधारण प्रवर्गाला ५० टक्के तर अनुसूचित जाती/जमातींना ७५ टक्के अनुदान दोन टप्प्यात डीबीटीद्वारे मिळतेदिव्यांगांसाठी ५ टक्के आणि महिलांसाठी ३० टक्के आरक्षण उपलब्ध आहे.जनावर मृत झाल्यास विम्याच्या रकमेतून नवीन दुधाळ जनावर पुरवले जाते.सोलर ३किलोवॅट, मिल्कींग मशीन, कडबाकुट्टी यंत्रासह आधुनिक उपकरणेही मिळतात..Farmers Foreign Study Tour Scheme: परदेश अभ्यासदौऱ्यातून आधुनिक शेती शिकण्यासाठी सरकारकडून मिळतयं २ लाखांपर्यंतचे अनुदान; पाहूयात योजनेची सविस्तर माहिती.योजनेची पात्रता व अटीया योजनेत सर्वप्रथम अत्यल्पभूधारक (१ हेक्टरपर्यंत), त्यानंतर अल्पभूधारक (१–२ हेक्टर), तसेच वनहक्क धारक आणि महिला बचत गटांना प्राधान्याने लाभ दिला जातो.लाभार्थ्याकडे किमान १ एकर स्वतःची जमीन असावी किंवा ५ वर्षांचा नोंदणीकृत भाडेपट्टा असावा. (वनहक्क धारकांसाठी ही अट लागू नाही)पशुपालन/दुग्ध व्यवसायाचे शासकीय प्रशिक्षण किंवा २ वर्ष अनुभव.वाटप होणारी जनावरे HF, जर्सी, गीर, सहीवाल इ. असतील; ती १-२ महिने पूर्वी वेली आणि दुसऱ्या/तिसऱ्या वेतातील असावीत.निवडी नंतर १ महिन्यात शेड व साधनसामुग्री खरेदी करावी; न केल्यास यादीत शेवटचा क्रमांक मिळेल.प्रकल्प किंमतीपेक्षा जास्त खर्च असल्यास फरकाची रक्कम लाभार्थ्याला उचलावी लागते.जनावरांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी बंधनकारक राहील.तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय अधिकारी लाभार्थ्यांच्या शेड निर्मिती, साधनसामुग्री व जनावर खरेदीचा अहवाल (खरेदी पावती, छायाचित्रे, बँक तपशील, विमा) जिल्हा उपायुक्तांना सादर करतील..आवश्यक कागदपत्रेस्वतःच्या नावे ७/१२ उतारा किंवा कमीतकमी ५ वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा करार.वनहक्क धारकांसाठी ७/१२ वर इतर अधिकार नोंद किंवा जिल्हाधिकारीकडून अनुसूची "जे" प्रमाणपत्र.पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायाचे शासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा २ वर्ष अनुभव प्रमाणपत्र (स्थानिक पशुवैद्यक/दुध संस्थेकडून); नसल्यास प्रशिक्षण घेण्याचे हमीपत्र.दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र.महिला बचत गट सदस्यत्व प्रमाणपत्र..अर्ज प्रक्रियाया योजनेच्या लाभासाठी लाभार्थींनी जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) किंवा तालुका पशुसंवर्धन कार्यालयात अर्ज सादर करावा. प्राथमिक तपासणीनंतर प्राधान्य क्रमाने निवड होईल. निवडी नंतर १ महिन्यात शेड, साधनसामुग्री व जनावरे खरेदी करावीत. खरेदी अहवाल (पावती, फोटो, बँक तपशील, विमा) सादर करून पहिल्या टप्प्यात ५० टक्के अनुदान मिळेल. त्यानंतर जनावर खरेदीनंतर दुसरा टप्प्यात संपूर्ण अनुदान डीबीटीद्वारे बँक खात्यात पारदर्शकपणे जमा होणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.