Akola News : या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तब्बल ४८० कोटी ५० लाख रुपये इतका निधी मंजूर केला आहे..यात पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना ३२३ कोटी ९२ लाखांची मदत आहे. चार लाख ४५ हजार ४५३ शेतकऱ्यांना हा लाभ मिळेल. अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम, तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना शासनाने ४८० कोटी ५० लाख रुपये मदत मंजूर केली आहे. .Crop Damage Compensation : अहिल्यानगरच्या तेरा तालुक्यांत नुकसानीपोटी मिळणार मदत.एकूण ६ लाख ७२ हजारांहून अधिक शेतकरी आणि सुमारे ५.३७ लाख हेक्टर शेतीक्षेत्र या अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते. शासनाच्या निकषांनुसार आणि केंद्राच्या सूचनांप्रमाणे मदत देण्यात येणार आहे. ही मदत थेट खात्यात प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. .Crop Damage Compensation : दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांना मदत देणार ः पालकमंत्री गोरे.बँकांनी ही रक्कम कोणत्याही कर्ज खात्यात वळवू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यांत झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून बुलडाणा जिल्ह्याला सर्वाधिक २९८ कोटी २७ लाख रुपये मिळाले आहेत. जिल्ह्यात ४ लाख ४९०८ शेतकऱ्यांना ही मदत मिळेल. या जिल्ह्यात ३ लाख ३३ हजार ६९३ हेक्टरचे नुकसान झाले होते..जिल्हानिहाय मदतजिल्हा बाधित शेतकरी क्षेत्र निधीअकोला १२०४६६ १०६५७६ ९११२.५८बुलडाणा ४०४९०८ ३३३६९३ २८९२७.८४वाशीम ४०५४५ ४०७४८ ३४६४.८४एकूण ४४५४५३ ३७४४४२ ३२३९२.१२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.