Vice President Election 2025 Resultउपराष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्राचे राज्यपाल आणि सत्ताधारी एनडीएचे उमेदवार डाॅ. सी. पी. राधाकृष्णन विजयी झाले आहेत. राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली आहेत. तर विरोधी पक्षाचे उमेदवार न्या. बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या निवडणुकीत १५ मते अपात्र ठरवण्यात आली. मंगळवारी ही निवडणूक पार पडली.. सी. पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती बनले आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत विजयी उमेदवाराच्या बाजूने क्रॉस व्होटिंगचे संकेत होते. दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाची काही मते फुटली असल्याची चर्चा सुरु आहे..Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा ‘जीआर’ मागे घेणार नाही : विखे पाटील. राज्यसभेचे महासचिव आणि निवडणूक अधिकारी पीसी मोदी यांनी या निवडणुकीबाबत माहिती देताना सांगितले की, उपराष्ट्रपती निवडणुकीत ७८१ पैकी ७६७ खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९८.२ टक्के मतदानाची नोंद झाली. ७५२ मते वैध होती. तर १५ मते अपात्र ठरली. यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा ३७७ पर्यंत कमी झाला..Soybean Rate: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोयाबीन उत्पादकांच्या पाठीशी उभे राहतील?.भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे ४२७ खासदारांचे संख्याबळ आहे. तसेच त्यांना वायएसआरसीपीच्या ११ खासदारांचा पाठिंबा मिळाला. छोट्या पक्षांच्या काही खासदारांनीही पाठिंबा दिल्याने राधाकृष्णन यांचे पारडे जड होते. यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला..राधाकृष्णन यांना सुमारे ४४० मते मिळतील अशी असे भाजपला अपेक्षित होते. पण त्याहून अधिक मते त्यांना मिळाली..इंडिया आघाडीला धक्काएनडीए उमेदवाराचा मोठ्या फरकाने झालेल्या विजयाने विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सर्व ३१५ खासदार एकजूट राहतील आणि ते रेड्डी यांना मतदान करतील, असा दावा इंडिया आघाडीने केला होता. पण निवडणूक निकालानंतर त्यांची काही मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.