Crop Damage Compensation: राज्यातील विविध जिल्ह्यांत जून २०२६ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेतपीक आणि शेतजमिनीच्या नुकसानीपोटी एकूण २९१ कोटी ९१ लाख ४ हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यात शेतपिकांच्या नुकसानीसाठी २६२ कोटी ६९ लाख ९५ हजार रुपये, तर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २९ कोटी २१ लाख ९ हजार रुपये इतक्या मदत निधीचा समावेश आहे. .याबाबतचा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने जारी केला आहे. राज्यातील एकूण ३ लाख ४४ हजार २७३ शेतकऱ्यांना २ लाख ७६ हजार ५९३ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ही मदत मिळणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोकण आणि नाशिक विभागीय आयुक्तांनी जून २०२६ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार २६२ कोटी निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा मदत थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे. .Farmer Relief: देवदर्शनाचा खर्च टाळून शेतकऱ्यांना मदत; गावातील तळे, बंधारे भरून दिले.तर याच कालवधीत अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीसाठी अमरावती, नागपूर, कोकण, नाशिक, पुणे विभागीय आयुक्तांनी निधी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासनाने २९ कोटी निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा केला आहे..Maharashtra Drought Relief: कोणत्या शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत मिळणार? ई-केवायसी करावी लागेल का? निकष जाहीर.कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार मदत?शेतपिकांच्या नुकसानीची मदत पुणे विभागातील सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, नागपूर विभागातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा तसेच कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार आदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल. .बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीड कोटी अवकाळीची मदततसेच मार्च २०२६ मध्ये बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १ कोटी ५८ लाख ९ हजार रुपये निधी वितरित करण्यासही शासनाने मंजुरी दिली आहे. ही मदत बुलढाणा जिल्ह्यातील ९२८ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी १,३०६ शेतकऱ्यांना मिळणार आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.