Unseasonal Rain Crop Damage Compensation: राज्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२५ आणि जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने आता ५३ कोटी ७३ लाख ७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे..यामध्ये बुलडाणा जिल्ह्यासाठी सर्वाधिक ३७ कोटी १५ लाख ५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, मदतीचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली..Tiger Attack Compensation: सोनवणे कुटुंबाला १० लाखांचा धनादेश.शासन निर्णयानुसार, बुलडाणा जिल्ह्यातील अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना नोव्हेंबर २०२५ चे नुकसानीसाठी ३७ हजार १४० बाधित शेतकऱ्यांसाठी ३० कोटी २० लाख २६ हजार रुपये तर जानेवारी नुकसानीसाठी ७ हजार ३५७ बाधित शेतकऱ्यांसाठी ६ कोटी ९४ लाख ७९ हजार रुपये अशाप्रकारे जिल्ह्यासाठी एकूण ३७ कोटी १५ लाख ५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा मदतीचा निधी ''डीबीटी'' पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. यासाठी लाभार्थ्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत..दुबार मदत टाळणारएकाच हंगामात एकाच नुकसानीसाठी दोनदा मदत मिळणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. मदत वाटपाची पारदर्शकता राखण्यासाठी लाभार्थ्यांची यादी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल..Crop Damage Compensation: मार्चमधील नुकसानीपोटी २५ कोटी भरपाईचा प्रस्ताव.या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीस मान्यता दिल्याने नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव-पाटील यांनी सांगितले..बँकांना वसुली करण्यास मनाईशासनाने स्पष्ट केले आहे की, नैसर्गिक आपत्तींतर्गत मिळालेली ही मदतीची रक्कम बँकांनी कोणत्याही जुन्या कर्ज खात्यात किंवा इतर वसुलीसाठी वळती करू नये. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, असेही सुचवण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.