Maharashtra Kharif Crop Registration: राज्यातील खरीप हंगामातील ई-पीक पाहणीला अपेक्षित गती मिळत नसल्याचे महसूल विभागाच्या १५ सप्टेंबरपर्यंतच्या प्रगती अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्यात यंदा ३९१.६४ लाख क्षेत्रावरील पिकांच्या नोंदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ११२.५७ लाख नोंदी मंजूर झाल्या असून १८.५० लाख नोंदींचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. अपेक्षित नोंदींच्या तुलनेत मंजूर नोंदींचे प्रमाण २८.७४ टक्के, तर पूर्ण झालेल्या सर्वेक्षणाचे प्रमाण केवळ ४.७२ टक्के आहे. पूर्ण झालेल्या सर्वेक्षणापैकी १६.४३ टक्के नोंदी मंजूर झाल्या आहेत..गेल्या वर्षी १५ सप्टेंबरपर्यंत ६५.६४ लाख क्षेत्रावरील पिकांच्या नोंदीची ई-पीक पाहणी झाली होती. त्यातून ६५ लाख ७८ हजार ३०९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा १८.५० लाख सर्वेक्षणे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या कामात मोठी घट दिसून येत आहे. दरम्यान, यंदाचे अपेक्षित उद्दिष्ट गेल्या वर्षीच्या ३३३.४८ लाखांच्या तुलनेत ५८.१६ लाखांनी, म्हणजे सुमारे १७.४४ टक्क्यांनी अधिक आहे..e-Crop Survey: ‘ई-पीक पाहणी’मुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ.कृषी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधाच्या प्रश्नावर गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या विविध टप्प्यांत ऑनलाइन कामकाजासह काही शासकीय कामांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. त्याचा ई-पीक पाहणीच्या क्षेत्रीय कामकाजाच्या गतीवरही काही प्रमाणात परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे..जिल्हानिहाय प्रगतीत मोठी तफावतविदर्भातील अमरावती जिल्ह्यात ५.८५ लाख नोंदी अपेक्षित असताना ३.०१ लाख नोंदी मंजूर झाल्या असून १.९५ लाख सर्वेक्षणे पूर्ण झाली आहेत. अकोल्यात ३.९५ लाख अपेक्षित नोंदींपैकी २.०१ लाख मंजूर झाल्या असून केवळ ४१.६० हजार सर्वेक्षणे पूर्ण झाली आहेत. यवतमाळमध्ये ५.६९ लाख अपेक्षित नोंदींपैकी २.८३ लाख मंजूर झाल्या असून १.३० लाख सर्वेक्षणे पूर्ण झाली आहेत. मराठवाड्यातही जिल्ह्यांमध्ये मोठी तफावत आहे. लातूरमध्ये ९.२९ लाख अपेक्षित नोंदींपैकी ६.६० लाख मंजूर झाल्या असून १.१६ लाख सर्वेक्षणे पूर्ण झाली आहेत. धाराशिवमध्ये मंजूर नोंदींचे प्रमाण ६३.७८ टक्के, तर हिंगोलीत ५९ टक्के आहे. याउलट छत्रपती संभाजीनगरमध्ये २९.२१ टक्के आणि जालन्यात ३०.२४ टक्के नोंदी मंजूर झाल्या आहेत..E-crop Survey: जांगडगुत्ता ई-पीकपाहणीचा!.पीक नुकसानभरपाईसह विविध कामांसाठी उपयोगई-पीक पाहणीतील नोंदींचा उपयोग पीकनिहाय माहिती, विविध शासकीय योजना, पीक नुकसानभरपाई, पीक खरेदी आणि कृषीविषयक कामकाजासाठी केला जातो. ई-पीक पाहणीच्या माध्यमातून पिकांची नोंद फोटो आणि जीपीएस लोकेशनसह केली जाते. रब्बी हंगाम २०२४ पासून डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. .यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्यात १४४ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी १५ सप्टेंबरपर्यंत १३७ लाख २३ हजार हेक्टरवर, म्हणजे ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पिकांची स्थिती अनेक भागांत बिकट असताना ई-पीक पाहणीची संथ गती ही महत्त्वाची बाब ठरत आहे. शेतकरी स्तरावरील नोंदणीनंतर सहाय्यक स्तरावर सुरू असलेले उर्वरित काम निर्धारित १० नोव्हेबरपर्यंत मुदतीत पूर्ण करण्याचे आव्हान महसूल यंत्रणेसमोर आहे..राज्यातील ई-पीक पाहणीमहसूल गावे ४४,५०९एकूण ७/१२ ची संख्या २ कोटी ५८ लाख १० हजार ८७७एकूण खाते संख्या ३ कोटी ३७ लाख ८८ हजार १४४शेती खाती संख्या २ कोटी २० लाख ८८ हजार ८१८.ठळक मुद्दे३९१.६४ लाख नोंदी अपेक्षित.११२.५७ लाख नोंदी मंजूर.१८.५० लाख नोंदींचे सर्वेक्षण पूर्ण.अपेक्षित नोंदींपैकी मंजुरीचे प्रमाण २८.७४ टक्के.अपेक्षित नोंदींपैकी पूर्ण सर्वेक्षणाचे प्रमाण ४.७२ टक्के.पूर्ण सर्वेक्षणापैकी मंजुरीचे प्रमाण १६.४३ टक्के..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.