Agricultural Credit: खरीप हंगामासाठी राज्यात आतापर्यंत ३०,८५७ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. ही रक्कम एकूण उद्दिष्टाच्या ५८ टक्के आहे. मात्र कर्जमुक्ती योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होताच नव्या पीककर्ज वाटपाच्या टक्केवारीत मोठी वाढ होईल, असा अंदाज बँकिंग क्षेत्रातील अधिकारी व्यक्त करीत आहेत..पीककर्ज वाटपात खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांपेक्षाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आघाडीवर आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना २०,२३६ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करावे, असे शासनाने सूचित केले होते. २८ जुलैअखेर या बँकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील २० लाख ४६ हजार शेतकऱ्यांना १७,८१६ कोटी रुपयांचे पीककर्ज देणे अपेक्षित होते. त्यानुसार आतापर्यंत २० लाख २१ हजार शेतकऱ्यांना १७,८१६ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले आहे. वाटपाचे हे प्रमाण उद्दिष्टाच्या ८८ टक्के इतके आहे..Farm Loan Waiver Scheme: राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्जाबाबतचा संभ्रम दूर, सहकारमंत्र्यांची माहिती.त्याउलट राष्ट्रीयीकृत बँकांनी केवळ ४ लाख २१ हजार शेतकऱ्यांना ९,६६० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले आहे. या बँकांनी राज्यातील १७ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना २२,२८० कोटी रुपयांचे कर्ज देणे अपेक्षित होते. मात्र, राष्ट्रीयीकृत बँका कर्जवाटपात पिछाडीवर आहेत. या बँकांनी आतापर्यंत केवळ ४३ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे..Crop Loan Distribution: पीककर्ज वाटपात बँकांचा हात आखडता.सहकार विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की खरीप पीककर्ज वाटपाची सध्याची टक्केवारी कमी दिसत असली, तरी कर्जमुक्ती योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होताच नव्या कर्जवाटपाला वेग येईल. त्यामुळे कर्जवाटपाची टक्केवारी आपोआप वाढेल. सध्या सर्व बँका आणि सहकार विभागाची यंत्रणा कर्जमुक्ती योजनेची प्रक्रिया पूर्ण करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे नियमित पीककर्ज वितरणाच्या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळालेली नाही. मात्र, पुढील दोन महिने कर्जवाटपासाठी उपलब्ध असल्याने आर्थिक वर्षअखेर एकूण पीककर्ज वाटपाचा आकडा समाधानकारक राहण्याची शक्यता आहे..पेरा संपूनही कर्जवाटप नाही चालू खरीप हंगामात भात वगळता बहुतांश पिकांचा पेरणीचा कालावधी संपत आला आहे. तरीही राज्यातील जवळपास २० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना अद्याप पीककर्ज मिळालेले नाही. राज्यात ४५ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी ५२,८५६ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरित करायचे आहे. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत ३०,८५७ कोटी रुपये, म्हणजेच उद्दिष्टाच्या ५८ टक्के कर्जवाटपच झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.