राज्यातील ३६ पैकी ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका जमीन खरडून गेल्याने सुपीकता आणि उत्पादकतेवर दीर्घकालीन परिणामशेती पूर्वपदावर येण्यासाठी ४ ते ५ वर्षे लागण्याची शक्यता.Maharashtra Crop Damage: महाराष्ट्रात, मुख्यतः मराठवाडा आणि सोलापुरात अतिवृष्टी आणि पुराने होत्याचे नव्हते झाले. राज्यातील ३६ पैकी ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. सप्टेंबरमधील पुरामुळे ६८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जमीन खरडून गेली आहे. यामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकतेवर दीर्घकालीन परिणाम जाणवणार असल्याची भीती मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. काही शेतकऱ्यांनी शेती पूर्वपदावर येण्यासाठी ४ ते ५ वर्षे लागतील, असे म्हटले आहे..अतिवृष्टी, पुराचा सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन, संत्री, डाळिंब, मका, बाजरी, कडधान्ये आणि कांदा आदी पिकांना बसला आहे. अनेक पूरग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जमीन खरडून गेल्याने आणि पुराच्या पाण्याने शेतात दगड वाहून आल्याने शेती नापीक झाली आहे..Rain Crop Damage: सप्टेंबरमधील अतिवृष्टीने महाराष्ट्रातील ६८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान.मे, जून, जुलै ते सप्टेंबर या दरम्यान राज्यातील ३३ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत २२५० कोटी रुपयांची मदत केली असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच सांगितले. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती लागू केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे..मान्सून माघारी फिरण्यास विलंब झाल्यामुळे अनेक राज्यांत, विशेषतः महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानमध्ये खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले..Flood Damage Relief: पशुधनासाठी राज्य सरकारची मदत जाहीर; प्रति दुधाळ जनावरासाठी मिळणार ३७ हजार ५०० रुपये.देशाच्या पश्चिम आणि पूर्वेकडील भागात अजूनही पाऊस सुरु आहे. यामुळे अनेक भागात खरीप पिकांच्या कापणीला उशीर झाला आहे. कृषी मंत्रालयातील सूत्रांनी म्हटले की, राज्यांकडून आलेल्या अहवालांच्या आधारे पिकांचे नेमके किती नुकसान झाले आहे, याचे मुल्यांकन केले जाईल. अतिवृष्टी, पुराचा भात, कडधान्ये, कापूस आणि ऊस या प्रमुख पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.