Pune News: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नुकतीच केली होती. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.०४) चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, आर्थिक पाहणी अहवालात या योजनेमुळे राज्याच्या महसुली तुटीवर ताण वाढल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील महिलांचे सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे..योग्य निर्णय घेतला जाईल- मुख्यमंत्री या मागणीबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. लाडकी बहीण योजनेबाबत विविध स्वरूपाच्या मागण्या समोर येत असून, यावर संबंधितांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचेही त्यांनी सांगितले..Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसीतील चुकीमुळे लाभ बंद झालेल्या महिलांसाठी दिलासा! शासन फेरपडताळणी सुरू करणार.लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर ताण…दरम्यान, लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर ताण येत असल्याची नोंद यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात करण्यात आली आहे. या योजनेसारख्या लोककल्याणकारी योजनांमुळे महाराष्ट्राची महसुली तूट वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकार या परिस्थितीला कसे सामोरे जाणार आणि योजनेबाबत कोणते निर्णय घेणार, याकडे लाभार्थी महिलांचे लक्ष लागले आहे..Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा ४० हजारांवर.विविध अडचणींमुळे योजना वादात..जून २०२४ मध्ये सुरू झाल्यापासून लाडकी बहीण योजना सातत्याने चर्चेत आहे. लाभार्थ्यांच्या नावांची कपात, ई-केवायसीची अडचण, तसेच इतर विभागांचा निधी या योजनेकडे वळवण्यात आल्याने ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तरीही महायुती सरकारने योजना बंद केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले असून, महिलांना दरमहा मिळणारी आर्थिक मदत सुरूच राहील, असे आश्वासन दिले आहे..महत्त्वाचे म्हणजे, या योजनेमुळे आर्थिक ताण वाढत असल्याचे अर्थ खात्याने यापूर्वी नमूद केले असले, तरी अजित पवार यांनी योजनेचा लाभ महिलांना नियमित मिळावा, यासाठी प्रयत्न केले होते, असेही सांगितले जाते. अशा पार्श्वभूमीवर आता या योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी पुढे आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.