Sustainable Bioenergy Projects in India: राज्य सरकारने ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) धोरण २०२६’ जाहीर केले असून, त्याद्वारे कृषी अवशेष आणि साखर कारखान्यांतील कचऱ्याचे इंधनात रूपांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे प्रेसमड, बगॅस आणि उसाच्या अवशेषांपासून हरित इंधननिर्मितीला चालना मिळणार आहे, तसेच तेल कंपन्यांकडून गॅस खरेदीची हमी, जलद मंजुरी प्रक्रिया आणि विविध प्रोत्साहनपर तरतुदींमुळे येत्या काळात साखर उद्योगासाठी अतिरिक्त उत्पन्नाची मोठी संधी निर्माण झाली आहे..‘सीबीजी’ प्रकल्पासाठी किमान २० टन प्रतिदिन सेंद्रिय कचरा किंवा मिथेनयुक्त जैविक स्रोत उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे लहान साखर कारखान्यांना एकत्रितपणे प्रकल्प उभा करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. धोरणात कारखान्यांतील उपउत्पादनांचा स्पष्टपणे ‘कच्चा माल’ म्हणून समावेश केला आहे. प्रेसमड, बगॅस आणि उसाचे अवशेष यांचा वापर ‘सीबीजी’ प्रकल्पांसाठी करता येणार आहे. कच्च्या मालाच्या सातत्यपूर्ण पुरवठ्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या, गोशाळा आणि साखर कारखान्यांसोबत दीर्घकालीन करार करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे..CBG Project: ‘सीबीजी’ प्रकल्पाने ‘सहकारा’ला ‘संजीवनी’!.पाचशे कोटी रुपयांची तरतूदप्रकल्प क्षमतेनुसार प्रतिटन कमाल ७५ लाख रुपयांपर्यंत निधी देण्यात येणार आहे. एका प्रकल्पासाठी कमाल १५ कोटी रुपयांची मर्यादा निश्चित केली आहे. २०२६-२७ साठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘सीबीजी’ उत्पादन सुरू झाल्यानंतर राज्य वस्तू व सेवा करातील २.५ टक्के रक्कम परतावा स्वरूपात देण्याची तरतूदही या धोरणात आहे..Pressmud Based CBG Production: शाश्वत ऊर्जा निर्मितीच्या दिशेने....धोरणातील महत्त्वाचे मुद्देप्रकल्पांसाठी जमीन वाटपात सवलतप्रकल्प क्षमतेनुसार प्रतिटन एक एकर या प्रमाणात जमीनजमीन मिळाल्यानंतर दोन वर्षांत प्रकल्प सुरू न झाल्यास रद्द करण्याची अटप्रकल्प मंजुरीसाठी एक खिडकी योजनावीज आणि पाणीपुरवठाही प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार‘सीबीजी’ प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या जैवखताच्या विक्रीसाठी कृषी विभागामार्फत साह्य .या धोरणातून प्रदूषण नियंत्रण, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न आणि हरित ऊर्जानिर्मिती या तिन्ही उद्दिष्टांचा मेळ साधला आहे. आर्थिक प्रोत्साहन, सुलभ मंजुरी प्रक्रिया आणि संस्थात्मक पाठबळामुळे राज्यातील जैवऊर्जा परिसंस्थेला बळकटी मिळेल. विशेषतः कृषी व साखर उद्योगप्रधान भागांमध्ये या धोरणाचा सकारात्मक परिणाम होईल.दिलीप पाटील, सहअध्यक्ष, शुगर बायोएनर्जी फोरम.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.