Agriculture Minister Statement: राज्यात बोगस व निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा करणाऱ्या १५ बियाणे कंपन्यांच्या विक्रीवर बंदी घालून त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, अशी घोषणा कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी (ता. ९) विधानसभेत केली..काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘‘विदर्भातील अकोला, अमरावतीसह अन्य जिल्ह्यांमध्ये निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत. मोठ्या प्रमाणावर पेरणी करूनही उगवण झाली नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे संबंधित कंपन्यांवर तातडीने कारवाई करावी.’’.Soybean Seed Controversy : निकृष्ट सोयाबीन बियाणे प्रकरणात कंपन्यांवर कारवाई; बियाणे विक्री परवाने निलंबित, कृषिमंत्र्यांची ग्वाही.त्यावर उत्तर देताना कृषिमंत्री भरणे म्हणाले, ‘‘अकोला, वर्धा, गडचिरोलीसह काही जिल्ह्यांत सोयाबीनची अपेक्षित उगवण झाली नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. .Seed Market Update: पावसामुळे बाजारात बियाणे खरेदीला वेग येण्याची विक्रेत्यांना अपेक्षा.त्यामुळे संबंधित कंपन्यांविरुद्ध बियाणे कायदा, १९६६, बियाणे नियम, १९६८ आणि बियाणे (नियंत्रण) आदेश, १९८३ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. संबंधित १५ कंपन्यांचे परवाने रद्द करून त्यांच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात येईल.’’.भरणे यांनी रवी सीड्स अँड रिसर्च, बूस्टर क्रॉप सायन्स, तिरुपती सीड्स, पार्श्वा अॅग्रीजिनेटिक्स एलएलपी, इनोवेग अॅग्रो, बालाजी अॅग्रो, उत्तम सीड्स, परम अॅग्रो सीड्स, जे.एस. सीड्स, त्रिमूर्ती सीड्स, धनलक्ष्मी क्रॉप सायन्स, विगोर सीड्स, सारस सीड्स, इगल सीड्स अँड बायोटेक आणि ममता सीड्स या कंपन्यांचा कारवाईत समावेश असल्याचे सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.