Maharashtra Government Decisions: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ( दि.२८ जुलै) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाॲग्री-एआय धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता व ॲग्रिटेक नाविन्यता केंद्र कार्यालयातील 'व्यवस्थापकीय संचालक' पदास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे..मंत्रिमंडळ बैठकीतील ८ महत्त्वाचे निर्णयकृषी विभाग: महाॲग्री-एआय धोरणांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता व अॅग्रिटेक नाविन्यता केंद्र कार्यालयातील 'व्यवस्थापकीय संचालक' पदास मान्यता. विधि व न्याय विभाग: मादक द्रव्ये व मादक पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अंतर्गत दाखल प्रकरणे चालविण्यासाठी पुणे येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यास मान्यता. विधि व न्याय विभाग: कर्जत (जि. अहिल्यानगर) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदे मंजूर करण्यास मान्यता. .Farm Loan Waiver: नियमित कर्ज फेडणाऱ्यांनाही २ लाख द्या अन्यथा राज्यभर आंदोलन, शेतकरी नेत्यांचा इशारा.विधि व न्याय विभाग: कुर्डुवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदे मंजूर करण्यास मान्यता.विधि व न्याय विभाग: अनुसुचित जाती/जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९, सुधारीत अधिनियम, २०१५ अनुसार दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी अहिल्यानगर, परभणी, सोलापूर, नांदेड व यवतमाळ येथे अनन्य विशेष न्यायालये (Exclusive Special Courts) स्थापन करण्यास मान्यता. ग्राम विकास व पंचायती राज विभाग: ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राखीव जागेवर निवडून आलेल्या उमेदवाराने जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणा करण्याकरिता अध्यादेश. .Farm Loan Waiver: कर्जमाफी यादीतील पात्र शेतकऱ्यांनी 'आधार प्रमाणीकरण' प्रक्रिया कशी करावी? .नगर विकास विभाग-१: मुंबई रेल्वे विकास महामंडळ मर्यादित कंपनीच्या अधिकृत समभाग भांडवलामध्ये २५ कोटी रुपयांवरून ५०० कोटी रुपयापर्यंत वाढविणार. कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलातही २५ कोटी वरुन २२५ कोटी रुपये वाढवणार. महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क: महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४८ (७) सुधारणा. गौण खनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतुकीसाठी स्वामित्वधनाच्या दहापट दंड. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.