Flood Damage: राज्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या प्रत्येक नुकसानग्रस्ताला शासनाची मदत मिळेल. कोणताही पात्र लाभार्थी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (ता. ७) दिली. नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून मदत वितरणात दिरंगाई होऊ नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले..बावनकुळे म्हणाले, की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, तसेच नुकसानग्रस्तांचे सर्व्हेक्षण पारदर्शक पद्धतीने करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत..Crop Insurance Compensation: पीकविमा भरपाईचे ३३६ कोटी तातडीने वाटप करा : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार .महसूल विभागामार्फत नुकसानीचे पंचनामे वेगाने पूर्ण केले जात असून एनडीआरएफ व एसडीआरएफच्या निकषांनुसार घरांची पडझड आणि अन्य पात्र नुकसानीसाठी तातडीचे अनुदान २४ तासांच्या आत वितरित करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले..Crop Insurance Compensation: पीकविमा भरपाईचे ३३६ कोटी तातडीने वाटप करा : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार .दरम्यान, २२ जुलै रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहितीही बावनकुळे यांनी दिली. या अभियानांतर्गत नुकसानभरपाईचे वितरण, स्वामित्व व प्रॉपर्टी कार्ड वाटप तसेच विविध महसूल योजनांचे लाभ नागरिकांना दिले जाणार आहेत..विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरील विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, की संबंधित काम अद्याप डिफेक्ट लायबिलिटी पीरियडमध्ये असल्याने त्यातील त्रुटी कंत्राटदाराकडूनच दूर केल्या जात आहेत. त्यामुळे या विषयावर अनावश्यक राजकारण करू नये. तसेच जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर काँग्रेसवर टीका करताना, अनेक वर्षे सत्तेत असूनही काँग्रेसने हा निर्णय घेतला नाही. मात्र केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून ती नियोजित टप्प्यांनुसार पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.