Mahanand Dairy : ‘महानंद’ अखेर ‘एनडीडीबी’कडे

Mahanand Transfer to NDDB : आर्थिक गाळात अडकलेल्या ‘महानंद’चे अखेर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे पाच वर्षांसाठी हस्तांतर करण्यात आले.
Mahanand Dairy
Mahanand DairyAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : आर्थिक गाळात अडकलेल्या ‘महानंद’चे अखेर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे पाच वर्षांसाठी हस्तांतर करण्यात आले. एनडीडीबीचे अनिल हातेकर यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून ते ११ मे रोजी कार्यभार स्वीकारणार आहेत.

राज्य सरकारने महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे हस्तांतर करण्याचा निर्णय मार्च महिन्यात घेतला होता. यासाठी २५३ कोटी ५६ लाख रुपये देण्यात येतील, असाही मंत्रिमंडळ निर्णय घेतला होता.

Mahanand Dairy
Mahanand Dairy : ‘महानंद’ कुणाच्याही घशात घालणार नाही

सध्या महानंदचे हस्तांतर झाले असले तरी पुनरुज्जीवनासाठी देण्यात येणारी रक्कम अद्याप हस्तांतरित करण्यात आलेली नाही. पुढील पाच वर्षांपैकी पाच महिने सरकारच्या दिरंगाईमुळे वाया गेले असून जी रक्कम मंजूर झाली आहे, ती मिळण्यासाठी ऑगस्ट उजाडणार असल्याचे समजते.

महानंद व एनडीडीबी यांच्यात करारनामा झाला असून पुढील पाच वर्षे महानंदचा कारभार एनडीडीबीकडे असेल. सध्या महानंदची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, कर्मचाऱ्यांचे सात महिन्यांचे पगार थकले आहेत. तसेच दूध संघांनी केलेल्या दुधपुरवठ्याची दोन देयके (पगार) थांबले आहेत.

Mahanand Dairy
Mahanand Dairy : ‘महानंद’चे पाच वर्षांसाठी ‘एनडीडीबी’कडे व्यवस्थापन

महानंदला केला जाणारा दूध पुरवठा ५४ हजार लिटरवर आला असून पगारावरील भार साडेचार कोटींचा प्रतिमहिना आहे. सध्या महानंदकडील ५३० कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केले आहेत.

महानंदचे एनडीडीबीकडे अधिकृतरीत्या हस्तांतर झाले आहे. महानंद मदर डेअरीने घेतला असे जे बोलले जात आहे त्यात तथ्य नाही. यापुढे महानंदचे पदार्थ आणि व्यवहार हे त्याच नावाने होतील. जळगाव दूध संघात आम्ही नफ्यात आणून संचालक मंडळाकडे दिला त्यापद्धतीनेच येथे काम होईल. सध्या महानंदची आर्थिक घडी बसवणे महत्त्वाचे आहे.
अनिल हातेकर, व्यवस्थापकीय संचालक, एनडीडीबी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com