Mahanand Dairy : महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांचा राजीनामा, 'महानंद'चे एनडीडीबीकडे हस्तांतरण होणारच?

Mahanand Chairman Rajesh Parjane : महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्यासह सर्व संचालकांनी दिला राजीनामा दिला आहे. यामुळे एनडीडीबीकडे हस्तांतरणाचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे.
Mahanand Dairy
Mahanand DairyAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील राजकारण सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था मानली जाणाऱ्या महानंदवरून तापलेलं होते. ही संस्था गुजरातच्या अमूलला देण्यात येणार असल्यानेच राजकारण तापलेलं होते. दरम्यान आता ‘महानंद’चे अध्यक्ष राजेश परजणे यांच्यासह सर्व संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने महानंदच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. अध्यक्ष राजेश परजणे यांच्यासह सर्व संचालकांनी बुधवारी (२१ तारखेला) आपल्या पदाचा राजीनामा दिला. याबाबतचे पत्र त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

गेल्या अनेक दिवसापासून महानंदच्या एनडीडीबीकडे हस्तांतरणावरून वाद उफाळला होता. यावरून जोरदार राजकारण तापले होते. तर यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर आजच जोरदार टीका केली होती.

Mahanand Dairy
Mahanand Dairy : कांदा निर्यात बंदी आणि महानंदवरून रोहित पवार यांची सरकारवर टीकेची झोड

तसेच ‘महानंद’च्या रूपाने राज्यातील आणखी एक प्रकल्प गुजरातला गिफ्ट केला जातोय असा आरोप राऊत आणि रोहित पवार यांनी केला होता. तर असाच आरोप विरोधकांनी देखील केला होता. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते.

दरम्यान काल बुधवारी अध्यक्ष राजेश परजणे यांच्यासह सर्व संचालकांनी राजीनामा दिला. याच्याआधी महानंदच्या संचालक मंडळाची १३वी बैठक नुकतीच मुंबईत पार पडली होती. यावेळी महानंदच्या आर्थिक परिस्थितीवर चर्चा झाली होती. तसेच महानंदचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक असल्याचे संचालक मंडळाने म्हटले होते. तर दूध महासंघाचे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे संघाचे हस्तांतरण करण्याचे नियोजन केले होते.

Mahanand Dairy
Mahanand Dairy : 'महानंद'वरून राऊत यांची सरकारवर बोचरी टीका; म्हणाले, 'सरकारला भीक....'

याबाबतचा २५३. ५७ कोटी रूपये शासनाकडून सॉफ्ट लोन किंवा भागभांडवलच्या स्वरूपात मदत मिळावी प्रस्ताव तयार सादर करण्यात आला होता.

दरम्यान कर्मचाऱ्यांना स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय देण्यात आला आहे. तर सध्याच्या अशा स्थितीत विद्यमान संचालक मंडळाने राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या कारभारात हस्तक्षेप करणे योग्य नसल्याच्या कारणाने ‘महानंद’चे अध्यक्ष राजेश परजणे, आ. माणिकराव कोकाटे आणि इतर १५ अशा १७ संचालकांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यांनी हे राजीनामे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक कान्हुराज बगाटे यांच्याकडे सुपूर्द केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com