Swachhata Abhiyan : पालखी मार्गावर २१ जुलै ते २५ जुलै दरम्यान ‘महा स्वच्छता अभियान’

Ashadhi Wari : आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींनी चांगले काम केले आहे. भाविकांना चांगल्या सेवा दिल्या, त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवले आहे.
palakhi
palakhiagrowon
Published on
Updated on

Solapur News : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील ग्रामपंचायती तसेच इतर मानाच्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींमध्ये व परिसरात २१ जुलै ते २५ जुलै या कालावधीत ‘महा स्वच्छता अभियान’ राबविण्याच्या सूचना सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिल्या आहेत.

आषाढी एकादशी नंतर दुसऱ्या दिवशी लगेच मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी व्हीसी घेऊन पालखी मार्गावर साचलेला कचरा हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. आषाढी यात्रा कालावधीत पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींनी चांगले काम केले आहे. भाविकांना चांगल्या सेवा दिल्या, त्याचबरोबर ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवले आहे.

palakhi
Ashadhi Wari 2024 :'बळीराजा सुखी राहुदे', मुख्यमंत्र्यांची विठ्ठलकडे मागणी; नाशिकचे शेतकरी दाम्पत्य पुजेचे मानकरी

पालखी मार्गावरील गावात स्वच्छता करण्याची आवश्यकता असून, त्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना आव्हाळे यांनी दिल्या आहेत. पाच दिवसाच्या या महास्वच्छता अभियानात पालख्या मार्गावरील ग्रामपंचायती बरोबरच गावठाण व परिसरात वास्तव केल्यामुळे प्लॉस्टिकसह अन्य कचरा गोळा झालेला आहे,

palakhi
Ashadhi Wari 2024 : विठ्ठल, विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी

तो वर्गीकरण करून संकलित करावा. संकलित केलेला कचरा जाळून नये, पालखी मार्गावरील डिव्हायडर (रस्ता दुभाजक) यामध्ये कचरा पडलेला आहे. झाडात अडकलेला कचरा काढून टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. फेकून दिलेल्या अन्नाचे अयोग्य व्यवस्थापन झाल्यास त्यामध्ये विषारी घटक तयार होऊन ते पावसाच्या पाण्यात मिसळून पिण्याच्या पाण्याच्या स्तोत्रामध्ये मिसळण्याची दाट शक्यता आहे, त्या दृष्टीने काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या.

नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक

पालखी मार्गावरील स्वच्छता योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी पालखी मार्गावरील गावासाठी नोडल अधिकारी नेमलेले आहेत. स्वच्छतेच्या कामात कोणी कुचराई करू नये. घनकचऱ्याचे वर्गीकरण करून व्यवस्थापन केलेल्या कामाची माहिती फोटोसह अहवाल या कार्यालयात पाठविण्यात यावा, असेही आव्हाळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com