अभिजीत पोवारGovernment MSP Policy: दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळत असतानाच आता शेतकरीही आपल्या प्रमुख मागण्यांसाठी आक्रमक झाले आहेत. मध्य प्रदेशात मूग पिकाला १०० टक्के किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी मंगळवारी अनेक शेतकरी धान्याची पोती, अंथरूण-पांघरूण, स्वयंपाकाची भांडी आणि आठवडाभराचा शिधा घेऊन भोपाळच्या बाहेरील सावरकर सेतू परिसरात दाखल झाले. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे..दरम्यान, मध्य प्रदेश सरकारनेही या प्रश्नात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा.अशी मागणी केली आहे. राज्याचे कृषी मंत्री ऐदलसिंह कंसाना यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांना पत्र पाठवून मूग खरेदीचे प्रमाण वाढवण्याची विनंती केली आहे. १४ मे ते ३ जुलै २०२६ या कालावधीत राज्यात सुमारे ८.०६ लाख मेट्रिक टन मूग उत्पादन झाल्याने सध्याच्या खरेदी व्यवस्थेत सर्व शेतकऱ्यांना एमएसपीचा लाभ मिळणे शक्य नसल्याचे सरकारने नमूद केले आहे..Farmer Protest: शेतीपंपांना केवळ दोन तास वीज; करमाळा तालुक्यातील शेतकरी आक्रमक.तर संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली १९ शेतकरी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मूगाची शंभर टक्के सरकारी खरेदी करावी, खत वितरणातील अडचणी दूर कराव्यात आणि खरेदी प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. शेतकरी मुख्यमंत्री निवासावर मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याने प्रशासनाने भोपाळमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे..Farmer Protest: पंजाब, हरियानाचे शेतकरी दिल्लीकडे.मूगासाठी १०० टक्के एमएसपीची मागणीशेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, तूर, उडीद आणि मसूर पिकांसाठी १०० टक्के एमएसपी खरेदीची तरतूद असताना मूगाला त्याच प्रकारचा लाभ मिळत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कमी दराने मूग विकावा लागत आहे. .वाढता उत्पादन खर्च, खरेदीतील विलंब आणि नोंदणी प्रक्रियेतील अडचणींमुळे ग्रामीण भागात नाराजी वाढत असून, सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.