अभिजीत पोवारe-KYC Latest Update: एलपीजी गॅस ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आधार आधारित एलपीजी गॅस ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी १६ ऑगस्ट २०२६ ही ई-केवायसीसाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत वाढवून २३ ऑगस्ट २०२६ करण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप ई-केवायसी पूर्ण न केलेल्या ग्राहकांना आणखी काही दिवसांची मुदत वाढ मिळाली आहे..स्वातंत्र्यदिनासह सलग सुट्ट्यांमुळे अनेक ग्राहकांना वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीचा विचार करून मुदत वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ग्राहकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेत २३ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे..LPG e-KYC Verification: LPG गॅस ई-केवायसी अंतिम मुदत जवळ; १५ ऑगस्टपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे गॅस कंपन्यांचे आवाहन.ई-केवायसी न केल्यास काय होईल?ई-केवायसी केली नाही म्हणून तातडीने एलपीजी कनेक्शन बंद केले जाईल, असे नाही. मात्र, ई-केवायसी प्रलंबित असलेल्या ग्राहकांना घरगुती दरात एलपीजी गॅस सिलिंडर मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तसेच लागू असलेल्या अनुदानाचा लाभ मिळवताना अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी मुदतीपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे फायदेशीर ठरेल..CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत.घरबसल्या करता येते ई-केवायसीएलपीजी गॅस ई-केवायसी करण्यासाठी ग्राहकांना गॅस एजन्सीत जाण्याची आवश्यकता नाही. संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत मोबाइल अॅपद्वारे आधार आधारित ई-केवायसी प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येते.इंडेन ग्राहक : IndianOil ONE अॅपद्वारे आधार आधारित फेस ऑथेंटिकेशन करता येते.भारतगॅस ग्राहक : Hello BPCL अॅपद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते.एचपी गॅस ग्राहक : HP PAY अॅपद्वारे ई-केवायसी करता येते..ऑनलाइन ई-केवायसी करताना तांत्रिक अडचण आल्यास ग्राहक आपल्या संबंधित एलपीजी गॅस वितरकाकडे जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता ग्राहकांनी २३ ऑगस्ट २०२६ पूर्वी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.