Water Level : यवतमाळ जिल्ह्यातील प्रकल्पांत मुबलक जलसाठा

Water Level Update : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा तसेच चापडोह प्रकल्पात सध्यातरी मुबलक जलसाठा आहे.
Water Level
Water LevelAgrowon

Yavatmal News : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा तसेच चापडोह प्रकल्पात सध्यातरी मुबलक जलसाठा आहे. त्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईची समस्या भेडसावण्याची शक्यता कमी आहे. मात्र, वितरण व्यवस्था अत्यंत कुचकामी असल्याने काही भागात कृत्रिम टंचाईचा सामना करावा लागत आहे.

शहरातील काही भागातील नागरिक तहानेने व्याकूळ झाले आहेत. निळोणा तसेच चापडोह या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात मुबलक जलसाठा आहे. दर वर्षी उन्हाळ्यातील पाणीटंचाईची झळ शहरवासीयांना जाणवते. साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरातील नागरिक पाण्यासाठी कासावीस होतात.

Water Level
Water Level : विहिरीतील पाण्याची पातळी खालावली

आता मात्र पाणी टंचाईनिर्माण होण्याची शक्यता नाही. शहराला निळोणा, चापडोह या प्रकल्पांसोबत बेंबळा प्रकल्पावरून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांचा पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे. नियोजन नसल्याने काही भागात कृत्रिम टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.

उन्हाचा प्रकोप वाढला, की पाण्याची मागणीसुद्धा वाढते. शहरातील प्रत्येक नागरिकाला पाणी मिळेल एवढी व्यवस्था निळोणा आणि चापडोह धरणातून होते. त्यांच्या सोबतीला आता बेंबळा आल्याने मोठा आधार मिळाला आहे. शहरातील ग्राहकांना पाणीपुरवठा करणारी वितरण प्रणाली अत्यंत कुचकामी आहे.

Water Level
Marathwada Water Level : मराठवाड्यातील प्रकल्पांत उपयुक्त साठा ३४ टक्के

सध्या दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची घोषणा प्राधिकरणाने केली असली तरी काही भागात आठ दिवसानंतर पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणात आजघडीला ७७ टक्के, तर चापडोह धरणात ७५ टक्के जलसाठा आहे. मुबलक प्रमाणात पाणी असताना वितरण प्रणालीमुळे शहरवासीयांना टंचाईची झळ सहन करण्याची वेळ आली आहे. शहरातील बहुतांश भागात अनियमित पाणीपुरवठा होत आहे.

जलवाहिनी फुटणे सुरूच

पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात जलवाहिनी टाकण्यात आल्या आहेत. अनेक भागात जलवाहिनी फुटत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. बेंबळा प्रकल्पावरून टाकण्यात आलेली जलवाहिनी अनेक वेळा फुटली आहे. त्यानंतर आता वितरण वाहिनी फुटत असल्याने पाण्याचा अपव्यय सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com