Jalgaon News : खानदेशात ई-पीकपाहणीला यंदा कमी प्रतिसाद मिळाला आहे. फक्त ३४ टक्के क्षेत्रावरील पेरणीसंबंधी ई-पीकपाहणीअंतर्गत पीक पेरा लावल्याचे दिसत असून, सुमारे ६६ टक्के क्षेत्र ऑनलाइन ई-पीक पाहणी अहवालात नापेर दिसत आहे. .खानदेशात प्रत्यक्षात पीक पेरा ९३ टक्के झाला आहे. त्यात कापसाची सर्वाधिक साडेसात लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यापाठोपाठ तृणधान्य, कडधान्य पिकांची पेरणी झाली आहे. तसेच केळी, ऊस या पिकांची लागवडही बऱ्यापैकी आहे. खानदेशात एकूण १४ लाख हेक्टरवर खरिपातील पिकांची लागवड झाली आहे. .शेतात पिके आहेत. परंतु तलाठी पीक पेरा नोंदवित नसल्याने सात-बारावर २०२५-२६ संबंधी पीक पेरणी हवी तेवढी दिसत नाही किंवा मोठे क्षेत्र नापेर दिसत आहे. ई-पीकपाहणीद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा नोंदविण्याची मुभा दिली आहे. परंतु शेतकरी ई-पीकपाहणीबाबत उदासीन आहेत..E-Peek Pahani : बीड जिल्ह्यात ई-पीक पाहणी नोंदणीला अल्प प्रतिसाद.पीकविमा योजनेत सहभागासाठी ई-पीकपाहणी सक्तीची आहे, असे कृषी विभाग म्हणत आहे. परंतु ई-पीकपाहणी करूनही केवळ निकषात न बसल्याने अनेक शेतकऱ्यांना पीकविमा परतावे मिळू शकलेले नाहीत. यामुळे प्रशासनाच्या ई-पीकपाहणीची सक्ती, आवाहन यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे.\.दुर्गम भागात अडचणीई-पीकपाहणीस शासनाने मध्यंतरी मुदतवाढ दिली होती. त्या वेळेस खानदेशातील फक्त १५ टक्के क्षेत्रासंबंधीच ई-पीकपाहणी झाली होती. आता या महिन्यात फक्त ३४ टक्के क्षेत्रावरील पिकांचीच ई-पीकपाहणी झाली आहे. सातपुडा भाग, दुर्गम क्षेत्रात ई-पीकपाहणी शक्यच नाही. कारण सातपुड्यात फक्त एकाच कंपनीचे नेटवर्क आहेत. .E-Peek Pahani : शेतकऱ्यांना ई-पीक नोंदणीची कसरत.तसेच इतर भागात अनेक शेतकरी तंत्रस्नेही नसल्याने ई-पीकपाहणीद्वारे पीक पेरा करू शकत नाही. काही शेतकऱ्यांकडे ॲण्ड्रॉईड फोन आहेत. परंतु त्यांना नेटवर्क हवे तसे मिळत नाही. अशा अनेक अडचणी असल्याने शेतकरी ई-पीकपाहणीबाबत उदासीन आहेत..ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला द्यावी जबाबदारीकाही गावांत ई-पीकपाहणीसाठी शेतकऱ्यांना इतरांची मदत घ्यावी लागते. त्यासाठी १०० ते १५० रुपये संबंधित घेत आहेत. या स्थितीत गावांत ग्रामपंचायतीत कार्यरत संगणक ऑपरेटरला हे काम दिले जावे. ग्रामपंचायतींत संगणक ऑपरेटर नावालाच काम करतात. त्यांना ई-पीकपाहणीचे काम दिले जावे, अशी मागणी ग्रामस्थ वारंवार करीत आहेत. परंतु याची दखल घेतली जात नाही, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.