Pik Vima Bharpai : सहा वर्षातच जवळपास ७०० हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान; शेतकरी आणि ग्रामिण अर्थव्यवस्थेला फटका

Crop Damage Issue : एका अहवालानुसार केवळ सहाच वर्षात जवळपास ७०० लाख म्हणजेच ७ कोटी हेक्टरवरचे शेतकऱ्यांच्या पिकांचे जास्त पाऊस आणि दुष्काळामुळे नुकसान झाले
Crop Insurance Compensation
Crop Insurance CompensationAgrowon
Published on
Updated on

Pune News : एका अहवालानुसार केवळ सहाच वर्षात जवळपास ७०० लाख म्हणजेच ७ कोटी हेक्टरवरचे शेतकऱ्यांच्या पिकांचे जास्त पाऊस आणि दुष्काळामुळे नुकसान झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना कुणीच वाली नसल्यासारखी परिस्थिती आहे. कारण सरकार थातुरमातूर मदत देऊन तोंडाला पानं पुसतं. पण शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरून मिळत नाही. विशेष म्हणजे हे दरवर्षी घडत असतं. सरकार शेतकऱ्यांना मदत तर करत नाही उलट शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी धोरण आखते. त्यामुळं शेती आणि शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर येत नाहीत.

वर्ल्ड इकाॅनाॅक फोरमच्या एका अहवालानुसार भारतातील शेतकऱ्यांना जास्त पाऊस आणि दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसला. २०१५ ते २०२१ या ६ वर्षांमध्ये जास्त पावसामुळे ३३९ लाख हेक्टर म्हणजेच ३ कोटी ३९ लाख हेक्टरवरच्या पिकांचे नुकसान झाले. तर ३५० लाख हेक्टर म्हणजेच ३ कोटी ५० लाख हेक्टरवरील पिकांचे दुष्काळामुळे नुकसान झाले. सहाच वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी अडचीत आले आहेत. पिकांचे नुकसान झाल्याने केवळ शेतकरीच नाही तर शेतीवर अवलंबून असलेले इतरही घटक अडचणीत आले, असेही या अहवालात म्हटले आहे. 

Crop Insurance Compensation
Crop Insurance Compensation : केंद्राची विमा भरपाईच्या आकडेवारीत चलाखी

हा आकडा केवळ जास्त पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे झालेल्या पीक नुकसानीचा आहे. पण वाढत्या उष्णतेचाही फटका पिकांना बसत आहे. मागच्या काही वर्षांपासून वाढणारी उष्णता हाही एक महत्वाचा धोका ठरत आहे. विशेषतः रब्बी पिकांवर उष्णतेचा जास्त परिणाम होत असतो. मागच्या दोन वर्षांपासून गहू पिकाचे उष्णतेमुळे नुकसान होत आहे. पिकांचे नुकसान अलीकडच्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची अपेक्षा सरकारकडून असते. पण सरकारी धोरणांचाही फटका कमी बाजारभावाच्या रुपात शेतकऱ्यांना बसतच असतो. या संकटांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Crop Insurance Compensation
Crop Insurance Compensation : खरिपासाठी अकराशे कोटींची विमा भरपाई

ग्रामिण अर्थव्यवस्था शेतीवर म्हणजेच पीक उत्पादनावर अवलंबून आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होत असल्याने ग्रामिण अर्थव्यवस्थेवरच संकट येत आहे. या कारणांमुळे ग्रामिण भागातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. शेतीपिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी सरकारने पीकविमा योजना सुरु केली आहे.

पण पीकविमा योजनाही शेतकऱ्यांचे नुकसानीची योग्य भरपाई देण्यात अपयशी ठरत असल्याची स्थिती आहे. पीकविमा योजना राबविण्यातील किचकट अटी आणि चालणारे गैरप्रकार यामुळे अनेक शेतकरी आजही विमा भऱपाईपासून वंचित राहत असल्याची परिस्थिती आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com