Nagpur News: खरेदी केंद्रांवर स्वीकारलेले सोयाबीन गोडाउनमध्ये नाकारले जात आहे. ज्या सोयाबीनचा ओलावा ९ टक्के आहे तोही नाकारला जात आहे. ही शेतकऱ्याची लूट आहे. तसेच खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी बीड येथील एका व्यक्तीमार्फत पणनमंत्री जयकुमार रावल यांचे ओएसडी चार लाख रुपये घेत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी (ता. १२) विधानसभेत केला. .‘सोयाबीन खरेदीचा बाजार’ हे वृत्त ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. खरेदी केंद्रांसाठी लाच मागितली जात असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा सभागृहात सादर केला. दरम्यान विरोधी सदस्यांच्या प्रश्नांच्या भडिमारासमोर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला..मात्र अध्यक्षांनी हस्तक्षेप केल्याने एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही. सोयाबीन खरेदीबाबत प्रश्नोत्तराचा तास संपताच वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या नाकारलेल्या सोयाबीनचे नमुने सभागृहात सादर करत गंभीर आरोप करून हा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. दरम्यान नाना पटोले यांनी हमीभाव खरेदी योजना शेतकऱ्यांसाठी नव्हे तर व्यापाऱ्यांसाठी आहे, असा आरोप केला..Soybean Purchase Fraud: सोयाबीन खरेदी केंद्रांसाठी पैसे, शेतकऱ्यांचा नऊ टक्के ओलाव्याचा सोयाबीन नाकारला; वडेट्टीवारांचा विधानसभेत गंभीर आरोप.वडेट्टीवार म्हणाले, ‘‘चांगल्या दर्जाचा सोयाबीन देखील जर सोयाबीन खरेदी केंद्र आणि गोडाउनमध्ये नाकारला जात असेल तर शेतकऱ्यांनी जगावे की मरावे? शेतकऱ्यांच्या विषयावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यावर सरकार गांभीर्याने घेत नाही. विदर्भात अधिवेशन सुरू असताना शेतकऱ्यांना न्याय द्यावा..बीड येथे अखिल नावाचा एक माणूस आहे. तो पणनमंत्र्याचे ओएसडी अभिजित पाटील आणि गर्जे यांचे नाव घेऊन केंद्र मंजूर करण्यासाठी चार लाख रुपये घेत आहे. इतके गंभीर प्रकार असूही पणनमंत्री उडवाउडवीची उत्तरे देत असतील आणि कारवाई होत नसेल तर आम्ही भावना कुठे मांडायच्या? राज्यभरातील ५०० खरेदी केंद्र चालकांकडून पैसे वसूल केले आहेत..Soybean Procurement Center: सोयाबीन खरेदी केंद्रांसाठी ‘स्वाभिमानी’ आक्रमक.नाना पटोले यांनी वडेट्टीवार यांचा मुद्दा लावून धरत म्हणाले, की व्यापारी आणि अधिकारी यांचे साटेलोटे आहे. ही खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे. तातडीने उच्चाधिकार समितीसमोर सोक्षमोक्ष लावावा. पणनमंत्री काल काय उत्तर देत होते हे पाहिले आहे. यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल..नाहीतर आम्ही सभागृहात येऊन काय उपयोग? असा सवाल त्यांनी केला. यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केंद्र मंजुरीसाठी पैसे मागितल्याच्या प्रकाराची चौकशी करावी, असे निर्देश दिले. तसेच हमीभाव खरेदीबाबत अन्य विषय अंतिम आठवडा प्रस्तावात मांडावेत, अशी सूचना केली. तसेच वडेट्टीवार आणि पटोले यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन अधिवेशन संपण्यापूर्वी निवेदन करावे, असेही निर्देश दिले..नाकारलेले सोयाबीन सभागृहातविजय वडेट्टीवार यांनी खरेदी केंद्र आणि गोडावूनमध्ये नाकारलेले सोयाबीन थेट सभागृहात आणले. बदनापूर येथील गजानन पाटील, सिंदखेड येथील संजय करजेवार, किनवट येथील भगवती सिंग, गजानन बुरावे या शेतकऱ्यांचे नाकारलेले सोयाबीन सभागृहात सादर केले. सारखनी केंद्रांवर नाकारलेले हे सोयाबीन जमा करण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.