Factory Revival: औराद (ता. दक्षिण सोलापूर) येथील लोकशक्ती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. साखर कारखान्याने २०२५-२६ चा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. हा कारखाना ‘अथर्व ग्रुप’च्या माध्यमातून पुनरुज्जीवित झाल्यानंतर, पहिल्याच टप्प्यात १ लाख ५१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून एक नवा टप्पा गाठला आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी दिली..हंगामाच्या सुरुवातीला व्यवस्थापनाने दिलेला शब्द पाळत, गाळप झालेल्या उसाचे संपूर्ण बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे. .Sugarcane Crushing: सोलापूरजिल्ह्यात दीड कोटी टन उसाचे गाळप.‘‘शेतकऱ्यांच्या घामाचा दाम वेळेत देणे ही आमची प्राथमिकता होती आणि ती आम्ही पूर्ण केली आहे,’’ असा विश्वास चेअरमन खोराटे आणि व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज खोराटे यांनी व्यक्त केला. .Sugarcane Crushing Season: सांगलीत गाळप हंगाम समाप्त.गेल्या दशकभरापासून बंद असलेल्या या कारखान्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण होत होती. मात्र, अत्यंत कमी वेळात तांत्रिक कामे पूर्ण करून कारखाना कार्यान्वित करण्यात आला. चालू हंगामाच्या यशानंतर कारखान्याने आता आगामी हंगामाची तयारी सुरू केली आहे..जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या उसाची नोंदणी लोकशक्ती कारखान्याकडे करावी, असे आवाहनही खोराटे यांनी केले आहे. हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, कार्यालयीन अधीक्षक विवेक पवार, मुख्य शेती अधिकारी राजाराम पवार, अभियंता सिद्धेश्वर शिंदे, अमोल कुलकर्णी, अखिल बिटे, संजय करजगी यांनी विशेष परिश्रम घेतले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.