Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधासाठी लोकजागर

Update on Shaktipeeth Highway Protest : संपूर्ण राज्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोधासाठी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या संघटनासाठी आज कृती समितीने गावोगाव जात लोकजागरण केले.
Protest of Shaktipeeth Highway
Protest of Shaktipeeth HighwayAgrowon
Published on
Updated on

Sangli News : संपूर्ण राज्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोधासाठी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या संघटनासाठी आज कृती समितीने गावोगाव जात लोकजागरण केले. येत्या शनिवारी (ता. २३) सांगलीवाडीत होणाऱ्या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

कृती समितीचे नेते किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांच्या उपस्थितीत जागोजागी बैठक झाल्या. त्याला उत्स्‍फृर्त प्रतिसाद मिळाला.

Protest of Shaktipeeth Highway
Hailstorm Update : कारंजा तालुक्यात गारपीट

आज, शेटफळे, घाटनांद्रे, तिसंगी, डोंगरसोनी, सावळज, मणेराजुरी, नागाव, कवठे आदी गावांत बैठका झाल्या. या वेळी शक्तिपीठ महामार्गाला विरोधाची भूमिका मांडण्यात आली. हा विरोध देव धर्माला नसून हजारो एकर जमीन गेल्याने होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीला आहे.

Protest of Shaktipeeth Highway
Crop Insurance : पीक नुकसानीसाठी आता जादा ‘पीकविमा’ भरपाई

हा रस्ता किती गरजेचा आहे हे आधी शासनाने पटवून द्यावे. त्यानंतर पुढे पाऊल टाकावे. वरकरणी देवाच्या नावार कंत्राटदार जगवण्याचा हा धंदा आहे, असा आरोप करण्यात आला. शनिवारी सांगलीवाडीत फल्ले मंगल कार्यालयात दुपारी बारा वाजता होणाऱ्या मेळाव्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील किसान सभेचे राज्यस्तरीय नेते अजित नवले उपस्थित राहणार आहेत.

शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले. प्रभाकर पाटील, सुनील पवार, पी. वाय. भोसले, गुलाम मुलाणी, किशोर कोडग, शरद पवार, भालचंद्र कोडग, अमर शिंदे, वामन कदम, शरद जाधव, विशाल गायकवाड, प्रकाश गायकवाड आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com