India US Trade Deal Protest : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ वरील सर्वसाधारण चर्चेला शुक्रवारी सुरुवात होताच लोकसभेत प्रचंड गोंधळ उडाला. विरोधी पक्षांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे काही मिनिटांतच लोकसभेचे कामकाज सोमवार (ता.९) सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले..सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्याने अवघ्या पाच मिनिटांतच लोकसभेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले..दुपारी पुन्हा सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु होती. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात फलक दाखवत सरकारवर टीका केली. यावेळी लोकसभेच्या अध्यक्षस्थानी कृष्णकुमार टेनेटी होते. त्यांनी विरोधी पक्षाने दिलेले तहकूब प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळल्याचे सांगत कामकाज पुढे नेण्याचा प्रयत्न केला..केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांच्यासह काही मंत्र्यांनी आपल्या नावावरील कागदपत्रे सभागृहात सादर करण्यास सुरुवात केली. परंतु त्याचवेळी विरोधी पक्षातील खासदारांनी अध्यक्षांच्या आसनाजवळ येत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज सोमवार सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब केले..संसद भवनाच्या मकर द्वाराजवळही विरोधकांनी शुक्रवारी आंदोलन केले. भारत-अमेरिका व्यापार कराराच्या निषेधार्थ विरोधी खासदारांनी हा करार 'सापळा' असल्याचा आरोप करत फलक दाखवले. यावेळी 'जो उच्चीत समझो वही करो, 'तानाशाही नही चलेगी' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही सहभाग घेतला..Union Budget 2026: मोठ्या घोषणा, अल्प निधी!.यापूर्वीही संसदेत गदारोळ झाला होता. २०२० मधील चीन सीमावादावर माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील उतारा उद्धृत करण्यास राहुल गांधींना परवानगी नाकारण्यात आल्यानंतर विरोधकांनी संसदेत आंदोलन केले होते. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.