Winter Session 2025 : काँग्रेसच्या एका रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धमकी दिल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. त्यावरून लोकसभेत प्रचंड गदारोळ निर्माण झाला. सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अवघ्या काही मिनिटांतच सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले..संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा सोमवारी (ता.१५) अकरा दिवस आहे. संसदेत महत्त्वाची विधेयके सादर होण्याची शक्यता आहे. परंतु सकाळच्या सत्रात सभागृहाचं कामकाज १२ पर्यंत तहकूब करण्यात आले आहे..Sansad Bhavan : जुन्या संसद भवनाचं पंतप्रधान मोदींनी केलं नामकरण.आठवड्याअखेरच्या सुट्टीनंतर सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाले. सुरुवातीला अध्यक्षांनी नुकतेच निधन झालेल्या सभागृहाच्या तीन माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर लगेचच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी उभे राहून रविवारी नवी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधानांना धमकी दिल्याचा आरोप करत निषेध नोंदवला..यावेळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत म्हटले की, “काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधानांची कबर खोदण्याची भाषा करण्यात आली. हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. पंतप्रधान मोदी हे देशातील १४० कोटी जनतेचे नेते असून जगातील एक मजबूत नेतृत्व आहेत. काँग्रेस पक्षाने या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे.” अशी मागणी लोकसभेत रिजिजू यांनी केली..राजकारणात पक्ष वेगवेगळे असले तरी ते शत्रू नसतात, असेही रिजिजू म्हणाले. "२०१४ मध्ये विरोधकांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या एका खासदाराला पंतप्रधानांनी माफी मागण्याचे निर्देश दिले होते आणि त्यानुसार माफी मागण्यात आली होती. आता काँग्रेसनेही पंतप्रधानांना दिलेल्या कथित धमकीबाबत माफी मागावी,” अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, गदारोळ कायम राहिल्याने अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले..Interview with Dr Ajit Navle: मुख्यमंत्र्यांनी डोंगर पोखरून उंदीर काढला....मनरेगाचे नाव बदलणार?ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) रद्द करून तिच्या जागी ‘विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन (ग्रामीण)’ हा नवा कायदा आणण्याचे विधेयक सरकारने लोकसभेतील सदस्यांमध्ये वितरित केले आहे. हे विधेयक लवकरच लोकसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी कायदे पुस्तकांतील उपयुक्तता संपलेल्या ७१ कायदे रद्द करण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. या ७१ कायद्यांपैकी ६५ कायदे हे मूळ कायद्यांतील दुरुस्त्या असून ६ कायदे हे स्वतंत्र (मूळ) कायदे आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.