Onion Rate : गावरान कांद्याला क्विंटलला ६,७०० रुपये

Onion Market : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जुन्या कांद्याच्या दरात रविवारी (ता.१०) झालेल्या लिलावात उच्चांकी दर मिळाला.
Onion
OnionAgrowon
Published on
Updated on

Pune News : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जुन्या कांद्याच्या दरात रविवारी (ता.१०) झालेल्या लिलावात उच्चांकी दर मिळाला. व्हीआयपी वक्कल गावरान जुन्या कांद्याला प्रति क्विंटल ६ हजार ७०० रुपये एवढा दर मिळाला आहे.

सरासरी प्रति क्विंटल साडेपाच हजार ते सहा हजार रुपये दर मिळाला. तर नवीन कांद्याला प्रति क्विंटल ४ हजार ६०० रुपये एवढा दर मिळाला. तर सरासरी दर प्रति क्विंटल ३८०० ते ४००० हजार रुपये एवढा दर मिळाला आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Onion
Onion Market: कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा

पावसाळ्यात झालेल्या अति पावसामुळे व मॉन्सूनोत्तर पावसामुळे कांदा चाळीत साठवणूक केलेल्या कांद्याचे अनेक ठिकाणी नुकसान झाले होते. त्यामुळे दिवाळीपूर्वी कमी-अधिक दर होत होते. परंतु दिवाळीनंतर बाजार समितीत येणाऱ्या जुन्या कांद्याच्या दरात काही प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यातच खरीप आणि लेट खरीप कांद्याचे उत्पादन सुरू झाले आहे. त्यामुळे बाजारात नवीन कांदा येऊ लागला आहे.

शिरूर मार्केटमध्ये सुमारे चार हजार कांदा गोणी आवक झाली होती. यामध्ये जुन्या कांद्याची जवळपास ३ हजार, तर नवीन कांद्याची एक हजार कांद्याची आवक झाली होती. मार्केटमध्ये दिवाळीनंतर दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी जुन्या कांद्याला उच्चांकी दर मिळाला आहे.

Onion
Onion Market : नव्या लाल कांद्याला ४ हजारांचा भाव

यामध्ये व्हीआयपी वक्कल कांद्याला प्रति क्विंटल ६२०१ ते ६७०० रुपये, नंबर एक कांद्याला ५५०१ ते ६२०० रुपये, नंबर दोन कांद्याला ५००१ ते ५५०० रुपये, गोलटा कांद्यासाठी ४००१ ते ५००० रुपये, गोलटी कांद्यासाठी ३००१ ते ४००० रुपये, दुभाळक(जोड) आणि चिंगळी कांद्यासाठी २००१ ते ३,००० रुपये दर होता.

नवीन कांद्याला मिळतोय चांगला दर

सध्या खरीप कांदा मार्केटमध्ये येत आहे. त्यामुळे जुन्या कांद्याच्या तुलनेत नवीन कांद्याला दर कमी असले तरी ते अधिक आहे. एक नंबर कांद्याला प्रति क्विंटल ४१०१ ते ४६०० रुपये, दोन नंबर कांद्याला ३००१ ते ४१०० रुपये, तर तीन नंबर कांद्याला १००१ ते ३००० रुपये दर होता.

मॉन्सूनोत्तर पावसामुळे कांद्याचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. आता जुना कांदा अंतिम टप्प्यात असून नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे जुन्याला अधिक दर मिळत आहे. मागील आठवड्यापासून हे दर वाढले आहेत.
अनिल ढोकले, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, शिरूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com