Shetmal Taran Yojana : शेतमाल तारणकर्ज योजनेत एक कोटी रुपयांवर कर्ज वितरण

Agriculture Mortgage Scheme : राज्य पणन मंडळअंतर्गत शेतमाल तारण कर्ज योजनेत शेतमालाच्या किमतीच्या ७५ टक्के कर्ज ६ टक्के व्याज दराने दिले जाते.
Shetmal Taran Yojana
Shetmal Taran YojanaAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : शेतमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी, हिंगोली जिल्ह्यात यंदा (२०२३-२४ ) सोमवार (ता. ५)पर्यंत परभणी, सेलू, मानवत, पाथरी व हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार या ५ कृषी उत्पन्न समित्या अंतर्गंत ११२ शेतकऱ्यांनी ५ हजार ५१७ क्विंटल शेतमाल तारण ठेवला असून शेतकऱ्यांना १ कोटी ८३ लाख ७७ हजार ७४० रुपये कर्ज वितरित करण्यात आले आहे. तारण शेतमालाची किंमत २ कोटी ४७ लाख ७६ हजार ९९५ रुपये आहे, अशी माहिती पणन मंडळाच्या सूत्रांनी दिली.

राज्य पणन मंडळअंतर्गत शेतमाल तारण कर्ज योजनेत शेतमालाच्या किमतीच्या ७५ टक्के कर्ज ६ टक्के व्याज दराने दिले जाते. परभणी, मानवत या कृषी उत्पन्न बाजार समित्या स्वनिधीतून तर सेलू व पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती पणन मंडळाच्या अर्थसहाय्याने ही योजना राबवीत आहेत.

Shetmal Taran Yojana
Farm Mortgage Loan Scheme : ‘शेतीमाल तारण’ चा १७८ शेतकऱ्यांना लाभ

या योजनेत सोमवार (ता. ५) पर्यंत परभणी जिल्ह्यातील १०१ शेतकऱ्यांनी सोयाबीन व हळद मिळून ५ हजार २ क्विंटल शेतमाल तारण ठेवला असून २ कोटी २५ लाख ३४ हजार ३३५ रुपये किमतीच्या या शेतमालावर १ कोटी ६६ लाख ९९ हजार ७४० रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.

पणन मंडळाने सेलू बाजार समितीला ५ लाख ३४ हजार ४०० रुपये तर पाथरी बाजार समितीला २६ लाख ४४ हजार १०० रुपये रक्कम प्रतिपूर्ती केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार (ता. औंढा नागनाथ) बाजार समिती अंतर्गंत ११ शेतकऱ्यांनी तारण ठेवलेल्या सोयाबीन व गहू मिळून एकूण ५१५.६८ क्विंटल शेतमालावर १६ लाख ७८ हजार ५० रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. पणन मंडळाची प्रतिपूर्ती केलेली रक्कम ७ लाख ४४ हजार १८८ रुपये आहे.

Shetmal Taran Yojana
Agriculture Mortgage Loan : लासलगाव बाजार समिती कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी शेतीमाल तारण कर्ज योजना

तारण कर्ज घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी

परभणी व हिंगोली जिल्ह्यातील १७ पैकी केवळ ५ कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतमाल तारण योजना राबवीत आहेत. सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. भविष्यात तेजीची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे सोयाबीनवर तारण कर्ज घेण्याकडे शेतकऱ्यांचा फारसा कल दिसत नाही. तूर्त शेतमाल तारण कर्ज योजनेला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद असल्याचे चित्र आहे.

शेतमाल तारण कर्ज स्थिती

(वजन क्विंटलमध्ये रक्कम लाख रुपये)

बाजार समिती शेतकरी संख्या तारण शेतमाल वजन एकूण किंमत कर्ज रक्कम

परभणी ३७ १७५५ ७८.९४ ५९.२०

मानवत ३४ १२९५ ५९.२२ ४३.२४

सेलू ५ १९५ ८.२३ ५.३४

पाथरी २५ १७५५ ७८.९४ ५९.२०

जवळा बाजार ९ ५१५ २२.४२ १६.७८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com