MahaDBT Portal : राज्यात योजना भाराभर, सर्व्हर एकच

MahaDBT Server Issue : शासनाच्या विविध योजनांसाठी एकच सर्व्हर दिलेले असून मोठ्या प्रमाणातील भारामुळे सध्या ही यंत्रणा व्यवस्थित कामच करीत नसल्याची स्थिती आहे.
MahaDBT Server
MahaDBT ServerAgrowon
Published on
Updated on

Akola News : शासनाच्या बहुतांश योजनांचा लाभ हा ‘महाडीबीटी’च्या माध्यमातून दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांना, नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे वारंवार आवाहन करण्यात येते.

मात्र, शासनाच्या विविध योजनांसाठी एकच सर्व्हर दिलेले असून मोठ्या प्रमाणातील भारामुळे सध्या ही यंत्रणा व्यवस्थित कामच करीत नसल्याची स्थिती आहे. सर्व योजनांसाठी एकच सर्व्हर वापरण्यात येत असल्याने ही परिस्थिती उद्भवलेली असल्याचे कारण पुढे केले जात आहे.

MahaDBT Server
MahaDBT : ‘महाडीबीटी पोर्टल’वर कागदपत्रे अपलोड होईना

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना फवारणी पंपासाठी ‘महाबीटी’वर अर्ज करण्यास सांगितले जात आहे. या पंपांचा लाभ मिळावा यासाठी शेतकरी वारंवार अर्ज भरण्याचा प्रयत्न करतात. परंतु सातत्याने हे सर्व्हर संथगतीने काम करीत असल्याने अर्जच दाखल होत नाहीत.

केंद्राकडून विविध योजनांसाठी राज्याला एकच सर्व्हर देण्यात आलेले आहे. या सर्व्हरवर महाडीबीटी, आधारलिंक, लाडकी बहीण, शिष्यवृत्ती अशा विविध योजना अवलंबून आहेत.

भार झेलण्याची क्षमता वाढविण्याबाबत राज्याकडून केंद्राकडे मागणीही करण्यात आलेली आहे. मात्र, यामध्ये अद्याप काहीही सुधारणा झालेली नसल्याने शेतकऱ्यांना, नागरिकांना तांत्रिक अडचणींचा फटका बसतो आहे.

MahaDBT Server
MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’च्या संथ चालीने केंद्रचालक त्रस्त

तासन्‌तास सीएससी केंद्रचालक अर्ज दाखल करण्यासाठी प्रतीक्षा करीत थांबलेले असतात. रात्री गर्दी कमी राहत असल्याने उशिरापर्यंत जागरण करीत अर्ज भरून घेण्याचे काम केले जाते. काही ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत केंद्रचालक काम करतात. तरीही सर्व्हर संथ गतीने चालत असल्यामुळे अर्ज लवकर भरले जात नाहीत.या बाबतच्या तक्रारींत आता वाढ झाली आहे.

आठ दिवस झाले प्रयत्न चालू आहे. पण अद्यापही ई-पीकपाहणी पूर्ण होत नाही, असा संदेश येत आहे. मला वाटते महसूल विभागाने शेतकऱ्यांना फक्त दोन गटाने जीपीएस टॅगिंगचे फोटो काढायला लावून ते कृषिसेवक किंवा तलाठी किंवा शेतकरी मित्र यांच्या मोबाइलवर देऊन बाकी माहिती ऑफलाइन लिहून नंतर ऑनलाइन करावी.
डॉ. गजानन गिऱ्हे, शेतकरी, जिल्हा बुलडाणा
‘महाबीडीटी’वर शेतकरी आयडी ओपन होत नाही. आधार लिंकच्या अडचणी आहेत. शासकीय चलन भरले जात नाही. अर्ज भरून झाला तर तो सबमिट होत नाही आणि ही सर्व प्रक्रिया एखादेवेळेस सुरळीत झाली, तर अर्ज पूर्ण होण्याची प्रक्रिया पार न पडता थेट साइटचे होमपेज उघडले जाते. अर्ज अर्धवट राहतो. पुन्हा तीच प्रक्रिया करावी लागते. तासन्‌तास यातच खर्ची होतात.
एक सीएससी केंद्रचालक

ई-पीकपाहणी होईना

ई-पीकपाहणी करण्यासाठी सध्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मी एका शेतातील ई-पीकपाहणी करण्यासाठी संपूर्ण शेत फिरलो, मात्र कुठेही योग्य असे लाइव्ह लोकेशन आले नाही. स्वतःच्या शेतात उभे असताना तुम्ही लोकेशनपासून दूर आहात, असे दाखवते. काही शेतकऱ्यांनी एकाच शेतात बसून ई-पीकपाहणी केली आहे. वेगवेगळे गट नंबर, शेत सर्व्हे नंबर असताना एकाच जागेवरून ई-पीकपाहणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com