Literary Award : मुंडले, देऊळगावकर यांच्या पुस्तकांना राज्य सरकारचे वाङ्‍मय पुरस्कार

Book Award : राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‍मय पुरस्कारांची घोषणा झाली आहे.
Literary Award
Literary Award Agrowon

Pune News : राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‍मय पुरस्कारांची घोषणा झाली आहे. त्यामध्ये शेती व पूरक साहित्य प्रकारात ‘ॲग्रोवन’चे उपमुख्य उपसंपादक मंदार मुंडले यांनी लिहिलेल्या ‘रासायनिक असो वा सेंद्रिय, शेती रेसिड्यू फ्रीच’ या पुस्तकाला वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर झाला आहे.

तर पर्यावरण साहित्यासाठी पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांच्या ‘पृथ्वीचं आख्यान’ या पुस्तकाला डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे.

Literary Award
Agriculture Award : कृषी पुरस्कारांच्या रकमांमध्ये भरीव वाढ

सन २०२२ च्या वर्षासाठी एकूण ३५ पुरस्कारांची शुक्रवारी (ता. ९) निवड करण्यात आली आहे. यातील श्री. मुंडले यांच्या ‘रासायनिक असो वा सेंद्रिय, शेती रेसिड्यू फ्रीच’ या पुस्तकात रासायनिक अवशेषमुक्त शेतीचे जागतिक महत्त्व, अन्न सुरक्षितता, ‘ट्रेसेबिलिटी’, कीडनाशकांचे लेबल क्लेम व दक्षतापूर्वक वापर, ‘एमआरएल’, ‘पीएचआय’, जनुकीय सुधारित पिके, ‘ग्लोबलगॅप’ व सेंद्रिय प्रमाणीकरण, शेतकरी यशकथा आदी विविध मुद्यांचा ऊहापोह या पुस्तकात करण्यात आला आहे.

Literary Award
Agriculture Department : ‘कृषी’तील २०३ उमेदवारांच्या नियुक्‍तीचा प्रश्‍न ऐरणीवर

श्री. देऊळगावकर यांच्या ‘पृथ्वीचं आख्यान’ या पुस्तकांत मानवानं निसर्गाच्या विरोधात पुकारलेलं आत्मघातकी युद्ध व प्रक्षुब्द्ध झालेल्या निसर्गाचा परतीचा प्रबळ हल्ला या ज्वलंत विषयाकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

सध्या जगातील पाणथळ जागा संपत चालल्या असून, वाळवंटीकरण होत आहे. जैवविविधताही संपत चालली आहे. मानवाने चालविलेले अनन्वित अत्याचार झेलणाऱ्या सहनशील धरतीकडून देण्यात आलेला निर्वाणीचा इशारा या पुस्तकातून देण्यात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com