मंगेश तिटकारे, हेमंत जगतापगोदाम पावती प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी गोदामांना परवाना देणाऱ्या आणि गोदामांची तपासणी करणाऱ्या संस्थेला सहकार्याची आवश्यकता असते. परवाना देणारी एजन्सी देशानुसार आणि तेथील नियमांनुसार शासकीय, सार्वजनिक, खासगी किंवा सार्वजनिक-खासगी संस्था असू शकते. .शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनामार्फत मध्यस्थांची साखळी कमी करण्यासाठी कृषिमूल्य साखळ्यांवर आधारित विविध योजना आणि प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. बाजारपेठेत ज्या विविध पीक आधारित मूल्य साखळ्या आहेत, त्या प्रस्थापित कृषिमूल्य साखळ्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी समुदाय आधारित संस्था म्हणजेच सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी व महिला बचत गटांचे फेडरेशन यांचेमार्फत व्यवसाय उभारणीच्यादृष्टीने अवलंब करण्यात येणाऱ्या विविध पर्यायांपैकी गोदाम पावती व्यवसाय सुरु करणे, हा सद्यःस्थितीत योग्य पर्याय आहे. तसेच शेती व्यवसायातील बाजारभावाची जोखीम कमी करण्यासाठी व शाश्वत उत्पन्न प्राप्त करून घेण्याच्यादृष्टीने गोदाम पावती योजनेत सहभागी होणे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीच्यादृष्टीने सुद्धा एक योग्य पर्याय असेल. जागतिक बँकेने शेतीमाल तारण व्यवसाय करताना वित्तपुरवठ्यासाठी वस्तूंचा किंवा शेतमालाचा तारण म्हणून वापर (वस्तू आधारित वित्त) याबाबत विशद केलेल्या संकल्पनेत शेतीमाल तारण व्यवसाय करताना शेतातील उत्पादनाचा वित्तपुरवठ्यासाठी तारण म्हणून वापराबाबतचे महत्त्व नमूद केले आहे..Warehouse Receipts: वित्तपुरवठ्यासाठी वस्तूंचा तारण म्हणून वापर.पीक आधारित (कमोडिटी-बॅक्ड) अर्थसाह्याची आवश्यकताकायदेशीर आणि नियामक चौकटगोदाम पावती प्रणाली कायदेशीर आणि नियामक चौकटीत बसविणे आवश्यक असते. तारण किंवा संपार्श्विक व्यवस्थापन करार (CMA) आणि साठवणूक संनियंत्रण करार (SMA) शक्यतो देशातील व्यावसायिक करार कायद्यांवर आधारित असतो आणि तो त्यानुसारच चालविला जातो. परंतु काही देशांमध्ये, जसे की पश्चिम आफ्रिकेतील कोट डी आय व्होअर सारख्या देशांमध्ये संपार्श्विक किंवा तारण व्यवस्थापनासाठी (टिअर्स-डिटेंशन) स्वतंत्र कायदे आहेत..गोदामांना परवाना आणि तपासणी करणाऱ्या एजन्सीला संस्थात्मक पाठिंबागोदाम पावती प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी गोदामांना परवाना देणाऱ्या आणि गोदामांची तपासणी करणाऱ्या संस्थेला सहकार्याची आवश्यकता असते. परवाना देणारी एजन्सी देशानुसार व तेथील नियमांनुसार शासकीय, सार्वजनिक, खासगी किंवा सार्वजनिक-खासगी संस्था असू शकते. त्याप्रमाणे देशातील नियमांव्यतिरिक्त विशेषतः कोणत्या सेवांमुळे ठेवीदारांचा, गोदाम ऑपरेटर आणि वित्तीय संस्थांकडून देण्यात येणाऱ्या गोदाम पावतीवर (WRS) वर विश्वास निर्माण होईल, यावर सर्व पुढील गोष्टी अवलंबून असतात.तारण किंवा संपार्श्विक व्यवस्थापन (CMA) आणि साठ्यावर देखरेख (SMA) करणाऱ्या कंपन्यांना कमीत कमी भांडवली गुंतवणूक, व्यावसायिक कौशल्य क्षमतांच्या आधारे शासकीय प्राधिकरणाकडून परवाना मिळणे गरजेचे असते. मेक्सिकोमध्ये तत्काळ असे परवाने दिले जातात..Warehouse Receipt Use: वित्तपुरवठ्यासाठी वस्तूंचा तारण म्हणून वापर.साठवणुकीसाठी पायाभूत सुविधा, गोदाम कामकाजाशी निगडित पद्धतींना पाठिंबासाठवणूक पायाभूत सुविधांचे प्रमाण व गुणवत्तेतील त्रुटी ओळखणे आणि साठवणुकीसाठी पात्र ठरू शकणाऱ्या योग्य गोदाम सुविधांचे मूल्यांकन करणे आवश्यक असते.गोदाम किंवा संपार्श्विक व्यवस्थापकांची तांत्रिक कौशल्ये सुधारण्यासाठी गरजेनुसार त्यांची क्षमता वृद्धी सुद्धा करणे गरजेचे असते. काही देशांमध्ये, उदा. मेक्सिको, मोझांबिक आणि श्रीलंका येथे शासन गोदामांच्या सेवा देणाऱ्या कंपन्यांना व्यावसायिक बँकांद्वारे गोदामांचे नूतनीकरण, पुनर्वसन किंवा नवीन बांधकामासाठी वित्तपुरवठा करतात, जेणेकरून जास्तीत जास्त लहान शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या गोदाम पावती विषयक सेवांच्या पुरवठ्यामध्ये वाढ होऊ शकेल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीच्या दृष्टीने त्यांना फायदा होईल..भागधारकांची क्षमता बांधणीशेतकरी, उत्पादक संस्था अथवा शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, व्यापारी आणि कृषी प्रक्रिया करणारे विविध भागधारक तसेच पिकांशी संबंधित कर्ज उत्पादने आणि त्याबाबतची प्रक्रिया विकसित करणाऱ्या वित्तीय संस्थांमध्ये गोदाम पावती आणि धान्य आधारित वित्तपुरवठा या संकल्पनेबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबरीने त्यांची क्षमता बांधणी करण्याचे प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे..Warehouse Receipt System: गोदाम पावतीसाठी कायदेशीर चौकटीचे महत्त्व.धान्य आधारित वित्त प्रणाली विकसित करण्यासाठी शिफारशीअनेक देश ज्या वस्तूंचा वापर तारण म्हणून करू शकतील, अशा वस्तू किंवा धान्य आधारित वित्तपुरवठा प्रणालीचा विकास करण्यात रस घेत आहेत. पश्चिम आफ्रिकेतील कोट डी आयव्होअर, केनिया, मालावी आणि सेनेगलमध्ये गोदाम पावती प्रणाली सुरू करण्यास सध्या जागतिक बँकेचे गट प्रकल्प प्रयत्नशील आहे. इथिओपिया, घाना आणि नायजेरियामध्ये धान्य आधारित वित्तपुरवठा प्रकल्पांद्वारे या प्रणालीबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. गोदाम पावती प्रणालीसाठी धान्य आधारित वित्तपुरवठा करून पुढे कसे जायचे यावर विविध शिफारशी देण्यात आल्या आहेत. .प्रत्येक देशाचा विद्यमान वस्तू बाजार (कमोडिटी मार्केट), तेथील वित्तीय क्षेत्राची परिस्थिती, कायदेशीर आणि नियामक वातावरणाची स्थिती, साठवण उद्योगाचे संघटन, व्यावसायिक तारण व्यवस्थापन कंपन्यांचे अस्तित्व यासह इतर अनेक घटकांवर या शिफारशी अवलंबून आहेत. तथापि, गोदाम पावती प्रणाली विकसित करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या अनेक देशांमध्ये धान्याचा तारण म्हणून वापर करण्यासाठी काही सामान्य शिफारशी देण्यात आल्या आहेत. खालील शिफारशींची यादी ही गोदाम आधारित तारणाशी निगडित वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने विशिष्ट पावले उचलण्याचे टप्पे आहेत. अशा शिफारशींची अंमलबजावणी संबंधित देश आणि तेथील बाजाराच्या परिस्थितीवर देखील अवलंबून असते..Warehouse Receipt: गोदाम पावतीसाठी कायदेशीर चौकटीचे महत्त्व.बाजारपेठेतील विद्यमान वित्तपुरवठा पद्धती, धोरणात्मक चौकट, बाजारातील सहभागी घटक जसे, की प्रक्रियादार, उद्योजक, व्यापारी, शेतकरी यांनी साठविलेल्या धान्याचा वापर तारण म्हणून करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच भागधारकांची, विशेषतः वित्तीय संस्थांची, धान्य आधारित तारण कर्ज देऊन वित्तपुरवठा व त्याचा विस्तार करण्याची इच्छा यांचे मूल्यांकन व कामाचा आवाका किंवा व्याप्ती ठरविण्यासाठी त्याचे सर्वेक्षण करून या अभ्यासाद्वारे निष्कर्ष काढणे अत्यंत गरजेचे आहे.सद्यःस्थितीत उपलब्ध असलेल्या साठवणूक सुविधांची किंवा गोदामांची परिस्थिती, त्यांची मालकी, त्यांचे व्यवस्थापन व विशेषतः सार्वजनिक गोदामांवर तृतीय पक्ष सेवापुरवठादारांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा याचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे..धान्य तारण कर्जपुरवठा संकल्पनेचा प्रचार करणे व त्यास प्रोत्साहन देण्याच्या संकल्पनेच्या यशस्विततेच्यादृष्टीने तांत्रिक सल्ला देणे, कर्ज देण्यासाठी तारण म्हणून कमोडिटी इन्व्हेंटरी म्हणजेच साठवणूक केलेल्या धान्याचा वापर आणि मूल्य साखळीची उपयुक्तता याबाबत विविध भागधारकांमध्ये जसे की बँका, बँक नियामक प्राधिकरण, सरकार, उत्पादक संघटना किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि कृषी व्यवसायाशी निगडित विविध भागधारकांमध्ये जागरूकता वाढवणे आणि अशा प्रकारच्या विशिष्ट मूल्य साखळ्यांसाठी वित्तपुरवठ्याशी निगडित विविध प्रकल्पांची निर्मिती करणे. याबाबतीत शासकीय वित्तपुरवठादार संस्था (SOEs) कृषी वित्तपुरवठ्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. या संदर्भात आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळाला (IFC) असे आढळून आले आहे, की धान्य तारण वित्तपुरवठ्याची उपयुक्तता दर्शविण्यासाठी शासकीय वित्तपुरवठादार संस्थांसोबत (SOEs) कामकाज केल्याने या प्रात्यक्षिकांचे महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतात. म्हणजेच यामुळे धान्य तारण वित्तपुरवठा योजना यशस्वी होऊ शकतात..गोदामे, संपार्श्विक किंवा तारण व्यवस्थापन कंपन्या, स्टॉक मॉनिटरिंग किंवा साठ्याचे संनियंत्रण अथवा साठ्यावर देखरेख करणाऱ्या कंपन्या, साठा तपासणी आणि परवाना घेण्याची प्रक्रिया इत्यादींसाठी उद्योगाशी निगडित मानकांचा विकास आणि प्रसार करणे गरजेचे आहे.व्यावसायिक तारण व्यवस्थापन सेवा आणि स्टॉक किंवा साठ्यावर देखरेख करणाऱ्या सेवांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे; तारण व्यवस्थापन आणि साठ्यावर देखरेख करणाऱ्या कंपन्यांची उद्योग संघटना मजबूत करणे; नावाजलेल्या अकादमीद्वारे प्रशिक्षणाची तरतूद करणे, वेअरहाऊस ऑपरेटर आणि साठ्यावर देखरेख करणाऱ्या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी परवाना व त्यांचे प्रमाणीकरण करणे, जेणेकरून उच्च व्यावसायिक मानके आणि प्रक्रिया यामुळे धान्य तारण वित्तपुरवठा प्रणालीवर सर्व भागधारक म्हणजेच शेतकरी, खरेदीदार, प्रक्रियादार, निर्यातदार यांचा विश्वास निर्माण होईल..धान्य आधारित कर्ज देण्यासाठी आणि योग्य आर्थिक उत्पादने आणि प्रक्रियांची रचना करण्यासाठी तारण म्हणून धान्याचा वापर ही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी बँका आणि बँक नियामकांना प्रशिक्षणाची तरतूद करण्यात यावी. तसेच कर्ज देण्याच्या विविध संधी दर्शविण्यासाठी बाजारपेठांचा अभ्यास करून विविध पिकांच्या मूल्य साखळ्यांमध्ये व्यवसायाची ओळख निर्माण करणे.इलेक्ट्रॉनिक वेअरहाउस पावत्या, ठेव प्रमाणपत्रे आणि त्याच्याशी संबंधित प्लॅटफॉर्मसह पावत्या सादर करण्यासाठी विविध पर्यायांचा शोध घेणे.आवश्यक असल्यास कायदेशीर आणि नियामक सुधारणांना आवश्यकतेनुसार पाठिंबा देणे.वेअरहाऊस परवाना आणि पर्यवेक्षण करणाऱ्या संस्थांना गरजेनुसार पाठिंबा देणे.- प्रशांत चासकर ९९७०३६४१३०(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. साखर संकुल, पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.