Solapur APMC : सोलापूर बाजार समितीतील १० अडत व्यापाऱ्यांचे परवाने रद्द

APMC Update : मागील काही दिवसापूर्वी यापैकी काही अडत्यांनी तर कांदा खरेदी करूनही शेतकऱ्यांच्या पट्ट्या थकवल्या. तसेच अनेकांना खोटे धनादेश दिल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
Solapur APMC
Solapur APMC Agrowon
Published on
Updated on

Solapur News : बेकायदेशीर अडत व्यापार करणारे आणि कांद्यासह शेतीमालाच्या पट्ट्या वेळेवर न देता शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील दहा अडत व्यापाऱ्यांचे थेट परवाने रद्द करण्याची कारवाई बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांनी केली आहे.

बाजार समितीतील कारवाई करण्यात आलेले अडत व्यापारी बेकायदेशीररीत्या अडत दुकान चालवत होते, गेल्या दोन ते तीन वर्षापासून त्यांच्याकडे परवाना नसतानाही शेतमालाची विक्री करीत होते, ही बाब प्रशासक निंबाळकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गांभीर्याने घेत थेट कारवाईचा बडगा उचलला.

Solapur APMC
Madhya Pradesh APMC : मध्य प्रदेशात हमाल-मापाऱ्यांना ओळखपत्र

दरम्यान, मागील काही दिवसापूर्वी यापैकी काही अडत्यांनी तर कांदा खरेदी करूनही शेतकऱ्यांच्या पट्ट्या थकवल्या. तसेच अनेकांना खोटे धनादेश दिल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे परवाना रद्दबाबत थेट कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Solapur APMC
Solapur APMC : टप्पा दुरुस्ती वगळता इतर सर्व मागण्या मान्य

व्यापाऱ्यांची नावे लावली फलकावर

बाजार समितीतील ज्या दहा अडत व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले आहेत, त्यांची नावे थेट डिजिटल फलकावर जाहीर करून, हे फलक बाजार समितीच्या आवारासह कांदा सेलहॅालमध्ये ठिकठिकाणी लावले आहेत. तसेच या अडत्यांकडे कोणताही शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, तसेच कोणताही व्यवहार त्यांच्याशी करू नये, असे आवाहनही प्रशासक मोहन निंबाळकर यांनी या फलकावर केले आहे. प्रशासक निंबाळकर यांच्या या कडक निर्णयाचे शेतकऱय़ांतून स्वागत होत आहेच, तसेच अशीच कारवाई सातत्याने व्हायला हवी, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हे आहेत ते दहा अडत व्यापारी

महादेव आण्णाराव पटणे, श्री विनायक ट्रेडर्स, उमेश दत्तात्रय गोटे, तुकाराम भारत पाटील, संभाजी विजयकुमार स्वामी, रणविजय ट्रेडर्स, सैपन जिलानी जमादार, विनोद सिद्धाराम चिकलंडे, महादेव किसन शिंदे, गुरू ट्रेडर्स या त्या कारवाई झालेल्या दहा अडत व्यापाऱ्यांची आणि त्यांच्या फर्मची नावे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com