Krushi Seva Kendra : बुलडाण्यात ज्यादा दराने बियाणे विक्रीप्रकरणी कृषी केंद्राचा परवाना निलंबित

License of agriculture center suspended : शेतकऱ्यांना ज्यादा दराने बियाणे विक्री केल्या प्रकरणात खामगाव येथील कृषी केंद्राचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
Krushi Seva Kendra buldhana News
Krushi Seva Kendra buldhana NewsAgrowon
Published on
Updated on

Buldana News : शेतकऱ्यांना ज्यादा दराने बियाणे विक्री केल्या प्रकरणात खामगाव येथील कृषी केंद्राचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.

खामगाव येथील कृषी केंद्रातून २०० रुपये जास्त घेत सोयाबीन बियाणे विकले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार होती. मात्र चौकशीमध्ये १० रुपये जास्त घेतल्याचे अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केले आहे.

ज्यादा दराने बियाणे विक्री करीत असल्याच्या तक्रारीनंतर उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ३१ मे रोजी खामगाव येथील अंकुर कृषी केंद्राचा पंचनामा केला.

नागापूर येथील पिंटू लोखंडकर या शेतकऱ्याला बियाणे विक्री केलेली पावती तपासण्यात आली. सोयाबीन २५ किलो बॅगेची किंमत ३६०० रुपये होती. दोन बॅगेचे शेतकऱ्याकडून ७२०० रुपये न घेता ७२१० रुपये घेतल्याचे आढळून आल्याचे अहवालात म्हटले.

Krushi Seva Kendra buldhana News
Fertilizer sales center : भंडाऱ्यातील १२ कृषी केंद्रांचे खत विक्री परवाने निलंबित

या प्रकरणात १ जूनला बुलडाणा येथे सुनावणी घेण्यात आली. या वेळी जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, खामगाव उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक व कृषी केंद्र चालक अंकुर अग्रवाल उपस्थित होते.

कृषी केंद्रातर्फे लेखी जबाब सादर केला त्यात सदोष आढळून आले. परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार दत्तात्रेय ढगे यांनी दिलेल्या आदेशात खामगाव येथील अंकुर कृषी केंद्राचा बियाणे विक्री परवाना १ जूनपासून पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे.

...या आढळल्या त्रुटी

साठा व भाव फलक अद्यावत न करणे, साठा पुस्तक अद्यावत न करणे, बियाण्याच्या नोंदी साठापुस्तकात न घेता विक्री करणे, कंपनीच्या उगमप्रमाण पत्राशिवाय बियाणे विक्री करणे, सोयाबीन बियाण्याचे खरेदी व विक्रीचे तपशील परिपूर्ण नसणे, उगमप्रमाणपत्र परवान्यात समाविष्ट नसणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com