Pune News: ‘‘चहूबाजूने धोक्यात आलेली शेती आणि मरणासन्न गावे, असे चित्र असले तरी निराशावाद जोपासू नका. नवे बदल घडत आहेत. शेतीत आता नवे तंत्रज्ञान व पूर्वीच्या नैसर्गिक पद्धतीचा मेळ साधत आनंदी गावे आणि समाधानी शेतकरी कुटुंबे निर्माण करूया,’’ असा प्रबळ आशावाद आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केला. .पुण्याच्या हॉटेल शेरेटॉन ग्रॅंड येथे सोमवारी (ता.२५) ‘सकाळ ॲग्रोवन’तर्फे आयोजित ‘ॲग्रिकल्चर ब्रॅण्डस ऑफ महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकच्या दिमाखदार प्रकाशन सोहळ्यात श्री. पवार बोलत होते. या वेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ.स्मिता कोल्हे, सकाळ उद्योग समूहाचे अध्यक्ष प्रताप पवार, सकाळ-अॅग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते..Rain Crop Damage : साहेब, आता सगळं संपलं; शेतात फक्त पाणीच पाणी.श्री. पवार म्हणाले, ‘‘कृषिकेंद्रीत ग्रामविकासाची संकल्पना मांडून त्यावर प्रभावी उपक्रम राबविण्याचे कार्य ॲग्रोवन सतत करीत आहे. पुढील २५ वर्षांत शेती क्षेत्रात काय बदल होतील, याचा विचार करून धोरणे आखली पाहिजेत. शेती, मातीचा शाश्वत विचार करणे हाच राष्ट्रधर्म आहे.’’.डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘विदर्भातील शेतकरी आत्महत्येची समस्या मेळघाटात नाही. कारण, शेतीचे मालक नसून विश्वस्त आहोत, असे मानून आम्ही मेळघाटात शेतीचे प्रयोग केले. यातून शेतीची भरभराट झाली. कृषी उद्योजकांनीही समाजासाठी आपली बुद्धी आणि संशोधन वृत्ती लावावी. शेतकऱ्यांचे भले होईल.’’.Farmer Protest: शेतकरी संघटनांकडून संघर्ष समितीची स्थापना; शेतकरी प्रश्नांवर राज्यव्यापी आंदोलन जाहीर.डॉ. स्मिता कोल्हे यांनी मेळघाटातील आदिवासी कृषी संस्कृतीचे वेगळेपण विषद केले. ‘‘शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, वृद्धाश्रम, अनाथालये मेळघाटात नाहीत. त्याचे श्रेय आदिवासी संस्कृतीला तसेच पुरुषांप्रमाणेच महिला शेतकऱ्यांनाही द्यावे लागेल. दुर्दैवाने व्यक्तीच्या कपड्यावर त्याची ओळख ठरते आहे. कपड्याला माती लागलेली असेल तर त्या व्यक्तीला तुच्छ लेखले जाते. पण शेतकऱ्याच्या कपड्याला माती असायलाच पाहिजे. त्याचा कायम सन्मान करा,’’ असे त्या म्हणाल्या..श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत सचोटीने व्यवसाय करणाऱ्या कृषी उद्योजकांचाही वाटा असतो. त्यामुळेच निवडक उद्योजकांच्या कार्याची महती सांगणारे कॉफी टेबल बुक ‘ॲग्रोवन’तर्फे प्रकाशित होते आहे.’’ ‘ॲग्रोवन’चे उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले यांनी आभार मानले. सूत्रसंचालन राहुल वाल्हेकर यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.