

Nagar News : बाजार समित्यांच्या रणधुमाळीनंतर राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातील प्रमुख नेते आमने-सामने आले आहेत. गणेश सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होत आहे.
या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनेलच्या विरोधात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव व जिल्हा बॅंकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी एकत्रित पॅनेल उभा केला आहे. हा कारखाना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे चालवत आहेत.
राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. नगर जिल्ह्यात थोरात, विखे, कोल्हे हे मातब्बर राजकीय कुटुंबे. त्यांचा जिल्ह्यात प्रत्येक निवडणुकीत राजकीय संघर्ष सुरू असतो.
नुकत्याच झालेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांत जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू होते. राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीवरून राजकीय संघर्ष सुरू आहे. गणेश कारखाना विखे पाटील कारखान्याने भाडेतत्त्वावर चालवायला घेतला आहे.
नगर जिल्ह्यात बहुतांश सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुका बिनविरोध केल्या जात आहे.
शेवगाव तालुक्यातील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असून, राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.
आठ वर्षांपूर्वी कुठे होते? : विखे
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी (ता. ११) शेतकऱ्यांशी संवाद साधत अनेक विषयांवर चर्चा केली. या वेळी विखे म्हणाले, की गणेश सहकारी कारखान्याबद्दल विरोधकांना एवढी आपुलकी होती, तर आठ वर्षांपूर्वीच चालविण्यास का घेतला नाही? आता सर्व दु:खीत एकत्रित आले आहेत. परंतु कारखाना कोण चालविणार, हे सांगायला ते तयार नाहीत.
‘गणेश’ सक्षमपणे चालवू : कोल्हे
विवेक कोल्हे यांनी प्रचार सभेत सांगितले, माजी मंत्री कै. शंकरराव कोल्हे यांचे गणेश कारखान्यावर आणि गणेश परिसरावर विशेष प्रेम होते. तब्बल ३८ वर्षे त्यांनी कारखान्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांचा नातू म्हणून त्यांचा हा वारसा घेऊनच मी या निवडणुकीच्या रिंगणात आहे.
तर सभासदांच्या आग्रहाखातर आम्ही येथे आलो. गणेश कारखान्याची आठ वर्षांत यांनी काय अवस्था करून ठेवली आहे, हे सर्वज्ञात आहे, असा आरोप माजी महसूलमंत्री थोरात यांनी केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.