Agrisure Fund : कृषी स्टार्टअपसाठी ‘ॲग्रीशुअर फंड’चा प्रारंभ

Agriculture Startup : देशातील ५० टक्के लोक आजही शेती करत असून कृषी क्षेत्रात नवे स्टार्टअप आणि विद्यार्थी येत आहेत. त्यांच्याकडे सगळे आहे. त्यांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी फक्त सरकारने आधार देण्याची गरज आहे.
Agrisure Fund
Agrisure FundAgrowon
Published on
Updated on

New Delhi News : देशातील ५० टक्के लोक आजही शेती करत असून कृषी क्षेत्रात नवे स्टार्टअप आणि विद्यार्थी येत आहेत. त्यांच्याकडे सगळे आहे. त्यांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी फक्त सरकारने आधार देण्याची गरज आहे. तो आधार देण्यासाठी आणि स्टार्टअपच्या विकासासाठी ‘ॲग्रीशुअर फंड’चा प्रारंभ करण्यात आला आहे.

त्यामुळे कृषी क्षेत्रातही नवे स्टार्टअप आणि विद्यार्थी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी (ता. ३) नवी दिल्ली येथे केले. कृषी स्टार्टअपला सक्षम बनविणारा ‘ॲग्रीशुअर फंड’ सुरू केला असून ७५० कोटींच्या प्रारंभिक निधीमध्ये नाबार्ड आणि कृषी मंत्रालयाकडून प्रत्येकी २५० कोटी आणि इतर संस्थांकडून २५० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Agrisure Fund
Digital Agriculture Mission : डिजिटल कृषी मिशनमुळे पीक विमा, शेतमाल खरेदी आणि पीक उत्पादनातील गैरप्रकाराला आळा बसणार

‘ॲग्रीशुअर फंड’ आणि ‘कृषी निवेश’ या दोन पोर्टलच्या प्रारंभप्रसंगी कृषिमंत्री चौहान बोलत होते. ते म्हणाले, की कृषी पायाभूत सुविधा निधीमध्ये ७८ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे आणि ६५ हजार हून अधिक पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

Agrisure Fund
Agriculture Development : शेती विकासासाठी डिजिटल युगाची पायाभरणी

पायाभूत सुविधांच्या विकासाचा काळजीपूर्वक विचार करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली. समस्या निर्माण करू शकतील अशा पायाभूत सुविधा निर्माण करू नका. तथापि, विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा जसे की कोल्ड स्टोअरेज आणि पिकवणे केंद्रे आवश्यक आहेत, असे ते म्हणाले.

त्यानंतर चौहान यांनी हा निधी प्रभावीपणे सुरू ठेवण्याची ग्वाही दिली. त्यांनी स्टार्टअपना या निधीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, प्रत्येक शेतकऱ्याला सक्षम बनविण्याचा सरकारचा विचार आहे. ॲग्रीशुअर फंडाचा प्रारंभ हा कृषी क्षेत्राप्रती असलेल्या आमच्या अतूट समर्पणाचा पुरावा आहे. उत्पादनात वाढ, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सरकार अथक प्रयत्न करेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com