Latur News: अमेरिकेसोबतच्या कराराचा जबर फटका शेतकऱ्यांना बसला असून येथील अडत बाजारात आठ दिवसात सोयाबीनचे भाव क्विंटलमागे साडेसहाशे रुपयांनी कोसळले आहेत. गेल्या १३ दिवसांत सोयाबीनच्या भावातील चढउतार शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे. सहा हजार रुपयांपर्यंत भाव गेले असताना आणखी भाव वाढतील, या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री केली नाही. भाव कोसळल्याने या शेतकऱ्यांना पुन्हा चुटपूट लागली आहे. .बुधवारी (ता. ११) सोयाबीनचा भाव पाच हजार २७१ रुपयापर्यंत खाली आला होता. शुक्रवारी (ता. १३) तो दोनशे रुपयांनी वाढला आहे. अमेरिका करारामुळे सोयाबीनच्या भावात ही चढउतार सुरु असून आता भाव वाढतील की आणखी कमी होतील, याबाबत शेतकऱ्यांचा पुरता गोंधळ उडाला आहे. .यावर्षी १५ नोव्हेंबरपासूनच सरकारने सोयाबीन खरेदी केंद्र सुरु केल्यामुळे बाजारातील भावाला शेतकऱ्यांना पर्याय होता. त्यामुळे सुरवातीला अनेक शेतकऱ्यांनी केंद्रावर सोयाबीनची विक्री केली. दीड महिन्यापासून भाव वाढायला सुरवात झाली. मागील महिन्यात हमीभावाचा पाच हजार ३२८ रुपये क्विंटलचा टप्पा ओलांडून भाव सहा हजार रुपयापर्यंत गेले. १२ दिवसांपूर्वी ३१ जानेवारी रोजी पाच हजार ९६० रुपये क्विंटलपर्यंत भाव पोहचला..Soybean Price: सोयाबीनने ओलांडला हमीभावाचा टप्पा.या स्थितीत बाजारात सोयाबीनची आवक २० हजार क्विंटलच्या पुढे गेली नाही. शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत असून अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीची आशा सोडून हमीभावाने खरेदी केंद्रावर सोयाबीनची विक्री केली. भाववाढ होण्यास सुरवात झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. .Soybean Prices: शेतकऱ्यांनी सोयाबीन विकल्यानंतर दरात उसळी.भाववाढीचा फायदा घेण्यासाठी शेतकरी आणखी भाववाढीची आशा ठेवून पुढे आले नाहीत तर काही शेतकऱ्यांनी भाववाढीचा लाभ घेतला. या स्थितीत आवक वाढली नाही. यामुळे शेतकऱ्यांकडे सोयाबीन विक्रीसाठी शिल्लक नसल्याचे चित्र आहे. भाववाढीची आशा सोडून हमीभावाने किंवा बाजारात मिळेल त्या भावाने सोयाबीनची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यानंतर वाढलेल्या भावामुळे चुटपूट लागली होती..आता आणखी भाववाढ मिळेल, या आशेने सोयाबीनची विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना भाव कोसळल्याने चुटपूट लागली आहे. अमेरिका करारानंतर सोयाबीनच्या भावावर परिणाम झाला असून बुधवारी सातच दिवसात ६८६ रुपये क्विंटलने भाव कमी झाले. दोन दिवसांनी ते दोनशे रुपयांनी वाढले तरी येत्या काळात पुन्हा सहा हजारापर्यंत जातील का, याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांचा गोंधळ उडाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.