Latur News : जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे जवळपास २ लाख ८७ हजार १५१ हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. .मंगळवारी (ता. २३) राज्य शासनाने लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त ३ लाख ८० हजार ५११ शेतकऱ्यांना २४४ कोटी ३५ लाख रुपयांची मदत जाहीर करून दिलासा दिला आहे. .Crop Damage Compensation : अतिवृष्टीच्या संकटात शासन बळीराजाच्या पाठीशी ः भरणे.राज्य शासनाने घोषित केलेली मदतीची रक्कम डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. .तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळती करू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, असे निर्देशही शासनाने दिले आहेत. .Crop Damage Compensation : अतिवृष्टीग्रस्तांना जुन्या मापदंडानुसार ५५३ कोटी मंजूर.त्यानुसार प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर केला होता..लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतलातूर तालुक्यातील ३० हजार २६५ शेतकऱ्यांना २१ कोटी ८१ लाख ५४ हजार रुपये, औसा तालुक्यातील ४६ हजार १८३ शेतकऱ्यांना ३१ कोटी ७५ लाख ८४ हजार रुपये, रेणापूर तालुक्यातील ४५ हजार ७७८ शेतकऱ्यांना २४ कोटी ७२ लाख ९९ हजार रुपये, निलंगा तालुक्यातील २७ हजार ७५८ शेतकऱ्यांना २१ कोटी २१ लाख ४१ हजार रुपये, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील २४ हजार ८७ शेतकऱ्यांना १६ कोटी १९ लाख ८ हजार रुपये, देवणी तालुक्यातील २६ हजार ९७४ शेतकऱ्यांना १८ कोटी ९९ लाख ४१ हजार रुपये, उदगीर तालुक्यातील ५२ हजार ७८३ शेतकऱ्यांना ३० कोटी ६९ लाख ४४ हजार रुपये, जळकोट तालुक्यातील २० हजार ७०० रुपये शेतकऱ्यांना १३ कोटी २६ लाख १७ हजार रुपये, अहमदपूर तालुक्यातील ५७ हजार ७३७ शेतकऱ्यांना ३६ कोटी ४६ लाख ८६ हजार रुपये आणि चाकूर तालुक्यातील ४८ हजार २४६ शेतकऱ्यांना २९ कोटी २२ लाख ३० हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.