Latur District Hospital Fund : लातूर जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा निधी विद्यापीठाला वर्ग

Latur Development Fund : पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जागेचा विषय मार्गी लागला आहे.
Government Fund
Government FundAgrowon
Published on
Updated on

Latur News : पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जागेचा विषय मार्गी लागला आहे. या जागेच्या मोबदल्यासाठी आरोग्य विभागाला प्राप्त झालेला ३ कोटी ३२ लाख रुपयांचा निधी कृषी विभागाच्या १४ मेच्या पत्रानुसार परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला वर्ग करण्यात आला. त्यामुळे ही जागा आरोग्य विभागाला हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सन २०१३ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली होती. १०० खाटांचे हे रुग्णालय उभारण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून ३१ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी ही प्राप्त झाला आहे. या रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची १० एकर जागा निश्‍चित करण्यात आली आहे.

या जागेचा मोबदला म्हणून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला ३ कोटी ३२ लाख ६८ हजार ६५० रुपये देण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र निधी अभावी ही कार्यवाही प्रलंबित होती. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच दौऱ्यात त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा शब्द दिला होता.

Government Fund
Government Fund : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे शासनाकडे अडकले १३५ कोटी

त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी आवश्यक निधी पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करून घेतला होता. हा निधी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाला होता. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही यासाठी आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या.

Government Fund
Misuse of Government Funds: बॅंकेला वैयक्तिक माहिती जोडण्याचे आदेश वरिष्ठांचेच; ‘एसएओ’ गोविंद मोरे यांचा युक्तिवाद

तसेच परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला हा निधी वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केला होता. मात्र हा निधी कोणत्या खातेक्रमांकावर जमा करावा, याबाबत संभ्रम असल्याने कृषी विद्यापीठाने राज्य शासनाच्या कृषी विभागाकडे मार्गदर्शन मागविले होते.

गेल्या काही दिवसांपासून हा विषय प्रलंबित होता. याविषयी पालकमंत्री भोसले यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर निधी कृषी विद्यापीठाच्या महसूल खाती जमा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक सर्व्हे क्र. ३७ मधील १० एकर जागेच्या मोबदल्यापोटी निधी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला वर्ग करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com