Onion Harvesting : लेट खरीप कांदा काढणी सुरू

Onion Poduction : खानदेशात लेट खरीप कांद्याची काढणी, साठवणूक सुरू आहे. कांदा पिकात काहीसा नफा राहत असून, उत्पादनही अनेकांना एकरी ६० ते ७० क्विंटल एवढे हाती आले आहे.
Onion Harvesting
Onion Harvesting Agrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Jalgaon News : जळगाव ः खानदेशात लेट खरीप कांद्याची काढणी, साठवणूक सुरू आहे. यंदा कापूस, मका पीक फारसे परवडले नाही. परंतु कांदा पिकात काहीसा नफा राहत असून, उत्पादनही अनेकांना एकरी ६० ते ७० क्विंटल एवढे हाती आले आहे. परंतु उत्पादन कमी व खर्च अधिक असल्याचा मुद्दाही शेतकरी उपस्थित करीत आहेत.

कांदादर स्थिर आहेत. निर्यात, खरिपात अधिकचा पाऊस व अन्य समस्या होत्या. यामुळे कांद्याची लागवड कमी झाली होती. धुळे, जळगाव जिल्ह्यात लागवड अधिक घटली. नंदुरबारमध्येही लागवडीत ३० टक्के घट झाली होती. अनेकांनी कांद्याऐवजी मका, तूर लागवड केली.

Onion Harvesting
Late Kharif Onion : लेट खरीप कांदा लागवडी १.८२ लाख हेक्टरवर

खानदेशात कांद्यासाठी धुळे जिल्हा प्रसिद्ध आहे. धुळ्यातील साक्री, धुळे या तालुक्यांत कांद्याची मिळून पाच ते सहा हजार हेक्टरवर लागवड केली जाते. पण या भागात पाऊसमान अधिक होते. यामुळे कांदा पीक खराब झाले. पुढे लेट खरिपातही लागवड घटली. खानदेशात एकूण साडेसात हजार हेक्टरवर लेट खरीप कांदालागवड झाली होती. सर्वाधिक लागवड धुळ्यात झाली होती. जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच हजार हेक्टरवर कांदा पीक होते.

जळगाव जिल्ह्यात यावल, चोपडा, चाळीसगाव, एरंडोल, धरणगाव या भागांत लागवड अधिक केली जाते. यावलमधील किनगाव, साकळी, चोपड्यातील अडावद, लासूर, धानोरा परिसर कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. कांदा लागवड खानदेशात ऑगस्ट व सप्टेंबरच्या मध्यापर्यंत लागवड झाली होती. ऑगस्टमध्ये लागवड केलेल्या कांद्याची काढणी, साठवणूक सुरू आहे. काही शेतकऱ्यांचा कांदा पक्व होत आहे. त्यात पुढील पंधरवड्यात काढणी सुरू होईल.


मजूरटंचाईचा सामना
कांदा काढणीसाठी मजुरांची अधिकची गरज असते. एकरी तीन ते साडेतीन हजार रुपये एवढी मजुरी कांदा काढणीसाठी लागत आहे. कांदा काढणीसाठी अनेक गावांत पारंगत मजूर समूह आहेत. त्यांना शेतकरी या कामासाठी वाहतूक खर्च देऊन आणत आहेत. उष्णता व पावसाळी स्थितीही खानदेशात आहे. यामुळे शेतकरी कांदा काढणीच्या धावपळीत आहेत.

बाजारात आवक स्थिर
कांद्याची लागवड यंदा कमी झाल्याने बाजारातील आवक स्थिर आहे. कांद्यासाठी जळगाव जिल्ह्यात जळगाव, यावलमधील किनगाव, चोपड्यातील अडावद, धुळ्यातील धुळे, साक्री, पिंपळनेर (ता. साक्री) येथील बाजार प्रसिद्ध आहेत. अनेक खरेदीदार थेट गावात जावून कांदा पिकांची माहिती व खरेदीचे नियोजन करीत आहेत. अनेक शेतकरी मध्य प्रदेशातील इंदूर, गुजरातमधील सुरत, अहमदाबाद येथेही कांद्याची पाठवणूक करण्याचे नियोजन करीत आहेत. कांद्याला सध्या खानदेशात सरासरी साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. थेट खरेदीत दर्जेदार काद्यांची मागणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com