Ahilyanagar News: रब्बी हंगामातील पिकांची ई-पीक पाहणी नोंदविण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तातडीने पिकांची नोंदणी करावी, यासाठी महसूल प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी वरिष्ठ अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत..पीकविमा, पीककर्ज तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणारे सरकारी अनुदान यांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी शनिवार (ता. २४) पर्यंत अंतिम मुदत असून शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या मुदतीत पिकांची ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंद न केल्यास संबंधित शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येऊ शकतात..E-Crop Survey: ई-पीक पाहणी करण्याचे आवाहन.शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष फील्डवर उतरले आहेत. शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, पोहेगाव आणि देर्डे या गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी स्वतःच्या मोबाइलवरून शेतकऱ्यांसमक्ष ई-पीक पाहणी नोंदणी करून दिली. या तत्परतेमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले..दरम्यान अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी अहिल्यानगर तालुक्यातील चास तसेच पारनेर तालुक्यातील सुपा आणि महासने या गावांमध्ये जाऊन पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय महसूल अधिकारी आणि तहसीलदार प्रत्यक्ष बांधावर उपस्थित होते..E Crop Survey: रब्बी हंगामातील ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी बाकी.अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी किंवा स्मार्टफोन नसल्यामुळे नोंदणी करणे शक्य होत नाही. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने प्रत्येक गावासाठी सहायक (मदतनीस) नेमण्याचे आदेश दिले आहेत. अंतिम मुदतीला आता काहीच वेळ शिल्लक असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी २४ जानेवारीपर्यंत आपली ई-पीक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे..गावपातळीवरील कर्मचाऱ्यांची मदतशेतकऱ्यांचा ई-पीक पाहणीत सहभाग वाढविण्यासाठी कोतवाल, ग्रामरोजगार सेवक, आशा सेविका तसेच ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या सहायकांना एकल पिकासाठी प्रति प्लॉट १० रुपये, तर मिश्र पिकांसाठी प्रति प्लॉट १२ रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या सहायकांची मदत घेऊन आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.