Land Update : कबजे गहाण जमिनीचा गुंता

Shekhar Gaikwad Article : भास्करराव मात्र अनेक वर्षे हे जमिनीचे पैसे परत फेडू शकला नाही. पुढे भास्कररावच्या मृत्यूनंतर जमीन खाशाबा या मुलाने परत मिळण्यासाठी प्रयत्न केले.
 Land
LandAgrowon
Published on
Updated on

Land Disputes : भास्करराव नावाच्या शेतकऱ्याने १९४५ मध्ये शेजारचा बागायतदार शेतकरी सुभानराव त्यांच्याकडून १६० रुपये उसने घेऊन जमीन कबजे गहाण दिली होती. भास्कररावने उसने घेतलेले पैसे व्याजासह तीन वर्षांच्या आत परत देऊन आपली जमीन सोडवून घ्यावी, असे गहाण खताच्या दस्तात म्हटले होते.

भास्करराव मात्र अनेक वर्षे हे जमिनीचे पैसे परत फेडू शकला नाही. पुढे भास्कररावच्या मृत्यूनंतर जमीन खाशाबा या मुलाने परत मिळण्यासाठी प्रयत्न केले.

१९६० मध्ये ही जमीन सुभानराव या कुळाच्या मालकीचे झाल्याचे रेकॉर्डवरून दिसत होते. खाशाबाला कळायला लागल्यानंतर जुने उतारे व फेरफार नोंदी काढल्या त्या वेळी लाखो रुपये किमतीची आपली जमीन केवळ १६० रुपये यासाठी सुभानराव याच्या मालकीची झाली हे काय खाशाबाला पटत नव्हते.

त्यामुळे त्याने पुन्हा जमीन मिळविण्यासाठी धडपड सुरू केली. परंतु त्याला त्यामध्ये यश येईना. गहाण खत केल्यावर एखादी व्यक्ती कूळ लागू शकते का? एवढ्या एकाच मुद्यावर अनेक वर्षे भांडणे सुरू होती.

 Land
Government Land : जमीन सरकारची, भांडतात शेतकरी

या प्रकरणामध्ये कूळ कायद्याच्या तरतुदीनुसार झालेले सर्व निकाल सुभानरावच्या बाजूने झाले होते. ते निकाल जोपर्यंत आहेत तोपर्यंत काही करता येणार नाही असे खाशाबाला सांगण्यात आले. त्यानंतर खाशाबाने वडिलांनी केलेला व्यवहार हा सावकारीचा व्यवहार होता, त्या जमिनीत सुभानराव जमिनीचा कधीही कूळ नव्हता असे कूळ कायद्याखाली अपील केले.

परंतु कूळ कायद्याच्या केसचा निकाल लागून ५० वर्षे उलटली असल्यामुळे ही केसच चालवायला पात्र नाही या मुद्यावरच खाशाबाचे अपील फेटाळण्यात आले.

तात्पर्य काय तर प्रत्येक कायद्यामध्ये किती दिवसांत अपील केले पाहिजे याची मुदत घालून दिलेली आहे. भारतीय मुदतीचा एक स्वतंत्र कायदा असून, कोणता खटला किती दिवसांत दाखल केला पाहिजे याच्या सर्व मुदती त्यामध्ये नमूद केलेल्या आहेत.

उशिरा जाग आलेल्या व्यक्तीला न्याय मिळण्यास कायदा मदत करीत नाही. शिवाय हल्ली जमिनीच्या किमती वाढल्यामुळे, भूसंपादनाची मोठी रक्कम मिळण्याची शक्यता निर्माण झाल्याने नव्याने जमिनीचे वाद तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com