अभिजीत पोवारGovernment Scheme: सामाजिक न्याय विभागाच्या निधीतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा महिला व बाल विकास विभागाकडे निधी वळवला आहे. सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वळवले आहेत, सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी महायुती सरकारने पुन्हा सामाजिक न्याय विभागाच्या निधी वळवला आहे.लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सातत्याने सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागाचा हजारो कोटींचा निधी वळवला जात आहे. त्याचा परिणाम या दोन्ही विभागांच्या इतर योजनांवर जाणवू लागला आहे..या योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून 344.74 कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आले आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला..Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?.फेब्रुवारी 2026 – जानेवारीच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी रुपये.जून 2025 – एप्रिल आणि मे महिन्याच्या हप्त्यासाठी 410 कोटी रुपये.ऑगस्ट-ऑक्टोबर 2025 – जुलै आणि सप्टेंबरच्या हप्त्यांच्या वितरणासाठी प्रत्येकी 410.30 कोटी रुपये..Ladki Bahin July Payment: लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी सरकारकडून भेट; जुलैच्या हप्त्यासाठी ३१९ कोटी निधी मंजूर.चौथ्यांदा निधीचे हस्तांतरणआता चौथ्यांदा सामाजिक न्याय विभागाचा निधी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आला आहे. सामाजिक न्याय विभागाचे तब्बल 344 कोटी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वळते करण्यात आले आहेत. सामाजिक न्याय विभागाने असा शासन निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण विचारीसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी मिळवण्याची वेळ आली आहे. लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून 344 कोटी रुपये महिला आणि बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आलेत..तर यापूर्वी कधी कधी हा निधी वळवण्यात आला होता तर फेब्रुवारी 2026 मध्ये, जानेवारीच्या हप्त्यासाठी 98.45 कोटी रुपये हे वळते करण्यात आले होते तर जून 2025 मध्ये एप्रिल आणि मे महिन्याच्या मानधनासाठी 410 कोटी रुपये हे वळवण्यात आले होते..तर ऑगस्ट ते ऑक्टोबर 2025 आणि जुलै आणि सप्टेंबरच्या हप्त्यांच्या वितरणासाठी 410 कोटी रुपये हे लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आले होते. आता लाडकी बहीण योजनेसाठी 344 कोटी वळते करण्यात आले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.